हिंगोली - विदर्भ मराठवाडा सीमेवरील कानडखेडा बु. येथील 33 केव्हीच्या उपकेंद्राचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी नियमित पाठपुरावा करून या उपक्रेंदाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
कानडखेडा बुद्रुक, कानडखेडा खु, कलबुरगा, वाढोणा, चिंचपुरी, वांझोळा, देवठाणा, कनेरगाव नाका अशी 9 ते 10 गावांना आडगाव येथील वीजकेंद्रावरून पुरवठा होत होता. मात्र, अनेक गावे या केंद्रावर अवलंबून असल्याने या ९ ते १० गावांना पुरेसा वीजपुरवठा होत नव्हता. अनेकदा रात्रही अंधारात काढावी लागायची. त्यामुळे कानडखेडा बु. येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र उभारण्याचे ठरले. मात्र, या उपकेंद्राचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडले होते. आमदार मुटकुळ यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, त्याला यश येत नव्हते. अखेर प्रशासनाला पाझर फुटला आणि या उपक्रेंद्राला मंजुरी मिळाली. त्यामुळे आज त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे आता या गावातील वीजेचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार मुटकुळे यांचे आभार मानले.
पालकमंत्र्यांचे वाहन चिखलात फसले -
ग्रामस्थ सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सकाळपासूनच पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेत थांबले होते. तसेच अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे रस्त्यावर चिखल झाले होते. पालकमंत्र्यांचे वाहन चिखलात फसल्याने कनेरगाव नाक्यापर्यंत आमदार मुटकुळ यांच्या वाहनातून त्यांना प्रवास करावा लागला. त्यानंतर कनेरगाव नाका येथे वाहन बदली केले.