हिंगोली - जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी ध्वजारोहण केले पालकमंत्री वर्षा गायकवाड या तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. सध्या औंढा व सेनगाव नगरपंचायत निवडणुकीची तयारी सुरू असून तेथे पालकमंत्री गायकवाड यांनी भेट दिली आहे. आज 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, गायकवाड यांनी ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची भेट घेतली.
निवेदनांचाही केला स्वीकार -गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी अनेक गावातील नागरिकांनी उपोषण सुरू केले होते. त्यांच्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वीकारले.