हिंगोली - वर्षभरापासून प्रतीक्षा असलेल्या आषाढी एकादशीच्या आनंदोत्सवावर कोरोनामुळे पाणी फिरले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांग लागत होती. त्यातच ओंढा नागनाथ येथील माळरानावरील गोकर्ण महादेवाची यात्रा देखील यावर्षी रद्द करण्यात आली. पोलीस प्रशासन व वनविभागाच्या वतीने मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. यात्रेनिमित्त नेहमी गजबलेला असणाऱ्या या माळरान परिसरात बुधवारी शुकशुकाट पाहायला मिळाला.
गोकर्ण माळावरील यात्रा रद्द, मंदिर परिसरात शुकशुकाट - आषाढी एकादशी २०२०
ओंढा नागनाथ व नरसी नामदेव येथे दरवर्षी आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. गोकर्ण महादेव येथील यात्रा महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. येथील महादेव मंदिर परिसरात दरवर्षी एक जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी यात्रा महोत्सव भरतो.
गोकर्ण माळावरील यात्रा रद्द...