ETV Bharat / state

तू माझ्यावर प्रेम करतेस का? असे विचारत त्याने तिला डांबलं स्वच्छतागृहात; अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - hingoli

पीडिता शुक्रवारी दुपारी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन्ही आरोपींनी पीडितेचा रस्ता अडवला. त्यांना ढकलून पीडिता पळत सुटली. मात्र, तिला पुन्हा गाठत एका स्वच्छतागृहात डांबले. त्यानंतर अल्पवयीन आरोपीने प्रेमाची कबुली दे, असा तगादा लावला.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 22, 2019, 5:08 PM IST

Updated : Jun 22, 2019, 6:00 PM IST

हिंगोली - 'तू माझ्यावर प्रेम करतेस का? माझ्या प्रेमाची कबुली दे' असे म्हणत एका प्रमेविराने तरुणीला स्वच्छतागृहात डांबले. कबुली देत नाही तोपर्यंत बाहेर काढणार नसल्याची धमकी त्याने दिली. जिल्ह्यातील दाताडा बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कुंडलिक माने (वय १८) असे आरोपीची नाव असून दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. पीडिता शुक्रवारी दुपारी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन्ही आरोपींनी पीडितेचा रस्ता अडवला. त्यांना ढकलून पीडिता पळत सुटली. मात्र, तिला पुन्हा गाठत एका स्वच्छतागृहात डांबले. त्यानंतर अल्पवयीन आरोपीने माझ्या प्रेमाची कबुली दे, असा तगादा लावला. पीडिता ओरडायला लागल्याने तिच्या भावाला मारण्याच्या धमक्याही दिल्या. त्यामुळे ती पूर्णपणे घाबरली होती. हा सर्व प्रकार तब्बल ३ तास चालत होता.

घटनेबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

विनवण्या करूनही आरोपींकडून सुटका होत नव्हती. त्यामुळे पीडिता जोरजोरात ओरडत होती. तिचा आवाज मामाच्या कानी पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना बघताच आरोपींनी घटनास्थळावरून धुम ठोकली. त्यानंतर पीडितेच मामाने सुटका केली. त्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून दोन्ही आरोपींविरोधात विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक ए. जी. खान करीत असून आरोपीला तत्काळ अटक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपासून एकतर्फी प्रेमाच्या घटनामध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळ बुद्रुक येथे 'तू तो मेरी जान है' असे म्हणत महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा ही घटना घडली आहे. त्यामुळे त्यामुळे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थीनींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालय परिसरात दामिनी पथक, चिडीमार पथक तैनात करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थिनींकडून होत आहे.

Intro:प्रेम म्हटलं की त्यासाठी काहीही करण्याची युवकांची तयारी असते, त्यातच प्रेमाची कबुली म्हणजे युवकासाठी तो जणू काही मोठा क्षण कोणता प्रेम वीर प्रेमिकेला प्रेमाची कबुली देण्यासाठी वेळ देतो तर काही प्रेम वीर घाई करतात. ती घाई एवढी ही नसेल जितकी हिंगोली जिल्ह्यातील दाताडा बुद्रुक येथील एका प्रेमवीराने केलीय. या प्रेम विराने कबुलीसाठी वेळ वैगरे काही मागली नाही. पीडिता वारंवार नकार देत असल्याने या महाशयाने पीडितेचा रस्ता अडवून तिला एका बंद स्वच्छता गृहात डांबऊन ठेवत तिच्याकडून प्रेमाची कबुली करून घेत होता. शेवटी तिचा नकार कायम असल्याने बाथरूम चे दार बंद करून धूम ही ठोकली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादिवरून सेनगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Body:अजय पंडित शिंदे(१५), विशाल कुंडलिक माने(१८) रा. दाताडा बु, असे आरोपीची नावे आहेत. आरोपीने शुक्रवारी दुपारी तीन च्या सुमारास शाळा सोडल्याचे प्रमाणात पत्र आणण्यास पायी गेलेल्या पीडितेचा पाठलाग करत तिचा रस्ता अडवला. तरीही पीडितेने आरोपीला ढकलून पुढे निघाली. तर आरोपी अजयने पीडितेचा रस्ता अडवला अन विशालने पीडितेला एका बंद असलेल्या स्वच्छता गृहात ढकलले. अन बाहेरून स्वच्छता गृहाची साकळी लावून घेत अजय माझ्या प्रेमची कबुली दे, असा तगादा लावत होता. पीडिता जोर जोरात ओरडत होती. त्यामुळे तू जोरात व रडशील तर तुझ्या भावाला ही जिवंत मारून टाकू अशा धमक्याही देत होता या सर्व प्रकाराने पीडिता पूर्णता घाबरून गेली होती जवळपास हा प्रकार तीन तास सुरू होता. अनेकदा विनवण्या करूनही आरोपीकडून सुटका होत नसल्याने पीडिता जोरजोरात ओरडू लागली. सदरील पीडितेचा आवाज मामाच्या कानी पडल्याने मामाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. पीडितेची मामाने सुटका केल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या मामाजवळ सांगितला. त्यावरून सेनगाव पोलीस ठाण्यात मध्ये रात्री दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे तपास पोलीस उपाधीक्षक ए. जी. खान, पोनि सरदरसिंह ठाकूर हे करीत आहेत. खान यांनी घटनास्थळी भेट दिली असून , आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करणार असल्याचे ईटीव्ही भारत शी सांगितले.

Conclusion:हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून एकतर्फी प्रेमाच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलीस ठाणे हद्दीत जवळा बु येथे घडलीय, चक्क आरोपीने घरासमोर वास्तव्यास असलेल्या एका महिलेलाच 'तू तो मेरी जान है' असे म्हणत विनयभंग केला. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच, पुन्हा एका प्रेम विराने प्रेमाच्या कबुलीसाठी असा आगळा वेगळा फंडा वापरला. त्यामुळे शाळा तसेच महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थीनीमध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामूळे महाविद्यालय परिसरात दामिनी पथक चिडीमार पथक तैनात ठेवण्याची मागणी पालक व विद्यार्थिनी कडून होत आहे. शाळा महाविद्यालय सुरू होताच विद्यार्थिनीचे छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या पोलीस ठाण्याचे बिजवल ftp ने अपलोड केले आहेत

बातमीत वापरावेत.
Last Updated : Jun 22, 2019, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.