हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना संशयित रुग्णाचा आज पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. हा रुग्ण दिल्लीच्या निझामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यामुळे हिंगोली आरोग्य प्रशासन अजून गतीने कामाला लागले आहे.
संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने सर्वांची झोप उडवली आहे. आता हिंगोलीतही कोरोणाचा एक रुग्ण आढळून आल्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाला 31 मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्याचा आज औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातून पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
त्यामुळे हिंगोली प्रशासन पुन्हा गतीने कामाला लागले आहे. तर दुसऱ्या एका 11 वर्षाच्या मुलीवरही आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. तिचा अहवाल अजून प्रलंबित आहे. मात्र, तिलाही सर्दी खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे ही सर्व कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. तर तिसरा रुग्ण हा कझाकिस्तान येथून आलेला आहे. हा रुग्ण होमकोरनटाईन ठेवलेल्या व्यक्तीचा भाऊ आहे. त्याला ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असून तो आणि चौथा रुग्ण कझाकिस्तानला गेलेले व्यक्ती आहत.
या दोन्ही रुग्णांना 1 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आलेले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून दोन्ही रुग्णांचे 'थ्रोट स्वब' अहवाल शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे अजूनही प्रलंबित आहेत. तर आज पहाटे अजून एका रुग्णाला आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केले आहे. त्याचे देखील थ्रोट स्वब अहवाल औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयाकडे पाठविले आहेत.
हा रुग्ण कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे. सध्या हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये तीन रुग्णांवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली उपचार सुरू आहेत. तर एक होमकॉरनटाईन आहे. एक कोरोना रुग्ण आढळल्याने मात्र आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.