ETV Bharat / state

ईटीव्ही इम्पॅक्ट: जेवण पुरवठा करणाऱ्या 'ओम साई सर्व्हिसेस'च्या गोदामावर अन्न व औषध विभागाचा छापा

author img

By

Published : Sep 9, 2020, 12:46 PM IST

अंधारवाडी परिसरात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलेल्या भोजनात चक्क अळ्या निघाल्याचे समोर आले आहे. भोजनात अळ्या निघाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची दखल हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी घेतली. अन्न औषध व प्रशासन(एफडीए)च्या पथकाने हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरात असलेल्या 'ओम साई सर्व्हिसेस'च्या गोदामावर छापा मारला आहे.

FDA Raid
एफडीए छापा

हिंगोली - शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सर्वप्रथम ईटीव्ही भारतने हा प्रकार उघडकीस आणला होता. याची दखल घेऊन अवघ्या 24 तासात अन्न औषध व प्रशासन(एफडीए)च्या पथकाने हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरात असलेल्या 'ओम साई सर्व्हिसेस'च्या गोदामावर छापा मारला आहे. रुग्णांना अन्नपुरवठा होणाऱ्या पदार्थांचे नमुने एफडीएने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. याबाबत अहवाल प्राप्त होताच संबधित कंत्राट दारावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

'ओम साई सर्व्हिसेस'च्या गोदामावर अन्न व औषध विभागाचा छापा

अगोदरच कोरोनाने हैराण झालेल्या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना जेवण देण्यात येते. आतापर्यंत लहान-सहान तक्रारी वगळता, उत्कृष्ट जेवण देण्यात आले आहे. मात्र, आता हळूहळू जेवणासंबंधी तक्रारी वाढत असून आता तर अंधारवाडी परिसरात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलेल्या भोजनात चक्क अळ्या निघाल्याचे समोर आले आहे. भोजनात अळ्या निघाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची दखल हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी घेतली. त्यानंतर प्रकरणाची चौकशी केली असता त्यात सत्यता आढळून आली. यानंतर ताबडतोब जेवणाचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले.

आता अन्न औषध व प्रशासनाने छापा मारून ओम साई सर्व्हिसेसच्या गोदामातून अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यातील अहवाल प्राप्त होताच, संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे अन्न औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.