ETV Bharat / state

मुख्यमंत्रीसाहेब कृत्रिम पावसाची गरज हिंगोलीतही, शेतकऱ्यांची आर्त हाक - rain in hingoli

हिंगोली जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अतुल सावे हे ध्वजारोहणानिमित्त जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आपण जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले होते. मात्र १२ दिवस उलटूनही अजून काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी फ़ारच संतापलेले आहेत.

कृत्रिम पावसाची गरज हिंगोलीतही
author img

By

Published : Aug 27, 2019, 9:21 PM IST

हिंगोली- ऑगस्ट महिना संपत आला असला तरीही हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करतो आहे. तर दुसरीकडे मात्र नवनिर्वाचित पालकमंत्री अतुल सावे हे ध्वजारोहणानिमित्त जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आपण जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचे सांगितले होते. हिंगोली जिल्ह्याला पावसाची गरज असल्याचे शेतकरी मोठ्या पोटतिडकीने सांगत आहेत.

आपली व्यथा मांडताना शेतकरी

औरंगाबाद, जालना परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग सुरू आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यातील नदी, नाले कोरडे आहेत. तर विहिरी व तलावांची देखील पाणी पातळी वाढलेली नाही. त्यामुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासुनच निर्माण झाला आहे. गंभीर बाब म्हणजे सोयाबीन आणि मुग ही पिके ऐन भरात असताना दाणे वाढण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे 15ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी आले असता, त्यानी हिंगोली जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले होते. मात्र 12 दिवस उलटूनही अजून काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी फ़ारच संतापलेले आहेत.

बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने कर्जबाजारी होऊन खरिपाची पेरणी केली. मध्यंतरी झालेल्या पावसाने इतर पिके बहरली. मात्र भुईमूग भरण्याच्या पावसात गायब झाल्याने पीक हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. कृत्रिम पावसाचे प्रयोग मात्र जालना, औरंगाबाद अहमदनगर याच भागात होत आहेत. म्हणून काही शेतकरी कंटाळून मुखमंत्र्यांना सांगतात की, साहेब हिंगोली जिल्ह्यात ही पावसाची खरी गरज आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचे प्रयोग हिंगोली जिल्ह्यातही करावेत अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतुन केली जात आहे.

Intro:ऑगस्ट महिना संपत आला असला तरीही हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी चातक पक्षासाठी पावसाची प्रतीक्षा करतोय तर दुसरीकडे मात्र नवनिर्वाचित पालकमंत्री अतुल सावे हे ध्वजारोहण निमित्त जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आपण जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचे सांगितले होते. मात्र अजूनही कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी फारच चिंतातुर झाला आहे. अन औरंगाबाद, जालना परिसरात कृत्रिम पाऊस पडण्याचे प्रयोग सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यालाही पावसाची गरज असल्याचे शेतकरी मोठ्या पोटतिडकीने सांगत आहेत.

Body:ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघे चार दिवस उरलेत तरीही जिल्ह्यात अध्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अजूनही जिल्ह्यातील नदी, नाले कोरडे ठाक आहेत. तर विहिरी व तलावांची देखील पाणी पातळी वाढलेली नाही. त्यामुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पासुनच निर्माण झालाय. त्यातच गंभीर बाब म्हणजे सोयाबीनला शेंगा लागत आहेत. तर मुगाला शेंगाही लागल्या आहेत. शेंगांमधील दाणे वाढण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे जेव्हा 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी आले असता,त्यानी हिंगोली जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना बोलणार असल्याचे सांगितले होते. मात्र 12 दिवस उलटूनही अजून काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी फ़ारच संतापलेले आहेत. आज घडीला हातातोंडाशी आलेली मुले दुपारच्या वेळी तर मनात असते त्यामुळे शेतकरी शेताकडे जाणे देखील टाळत आहेत.

Conclusion:बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने कर्जबाजारी होऊन खरिपाची पेरणी केली पिकाची उगवण बऱ्यापैकी झाली मध्यंतरी झालेल्या पावसाने इतर पिकांना बहरली मात्र शेंगा लागणीच्या भरन्याच्या पावसात गायब झाल्याने पीक हातचे जाण्याच्या मार्गावर आहे आणि कृत्रिम पावसाचे प्रयोग मात्र जालना औरंगाबाद अहमदनगर याच भागात होत आहेत म्हणून काही शेतकरी कंटाळून मुखमंत्र्यांना सांगतात की, साहेब हिंगोली जिल्ह्यात ही पावसाची खरी गरज आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचे प्रयोग हिंगोली जिल्ह्यात ही करावेत अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतुन केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.