हिंगोली- जिल्ह्यामध्ये काही केल्या आत्महत्येचे सत्र कमी होताना दिसत नाही. केसापूर गावामध्ये एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. आश्रू आनंदा शिंदे (32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - सोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा, माढेकरांनी एकत्र साजरा केला गणेशोत्सवसह मोहरम
शिंदे यांना एकूण 6 एकर शेती आहे. मात्र, सततच्या नापिकीमुळे डोक्यावर असलेले बँकेचे 80 हजार आणि खासगी 2 लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेमध्ये ते गेल्या काही दिवसांपासून होते. तर 4 दिवसांपासून ते एकांतातच राहात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
हेही वाचा - कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; शहरातील सखल भागात पुन्हा शिरले पाणी
खासगी कर्जवाले वारंवार रकमेची मागणी करत. त्यामुळे शिंदे तणावाखाली खाली येत होते. त्यांनी रविवारी घरी कोणीच नसल्याचे पाहून स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घरची मंडळी जेव्हा घरी परतली तेव्हा आतून घर लावलेले आढळून आले. त्यांनी अनेकदा आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी दार तोडले. तर शिंदे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती नरसी पोलिसांना कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.