ETV Bharat / state

आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या 'मशरूमची शेती' - शेख मोबिन

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात मशरूमची शेती केली जाते. सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील एमबीएचे शिक्षण पूर्ण करून नोकरीनिमित्त परराज्यात असलेल्या अकीब शेख यांनी आपले काका शेख मोबिन यांच्या मदतीने मशरूम शेती करण्यास सुरुवात केली.

mashroom
मशरूमची शेती
author img

By

Published : Jan 3, 2020, 11:05 AM IST

हिंगोली - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही सुशिक्षित तरुण शेतीला जोडव्यवसाय म्हणून मशरूमच्या शेतीकडे वळलेले आहेत. त्यानुसार मशरूम आता जिल्ह्यात चांगलेच प्रसिद्ध होत आहे. हे मशरूम आरोग्यासाठी गुणकारी असले तरीही पाहिजे तेवढी याची जनजागृती झालेली नाही. मात्र, ही शेती करणे म्हणजे समुद्रातून मोती काढल्यासारखेच असल्याचे कोळसा येथील लिमरा मशरूम उत्पादकांनी सांगितले. अनंत अडचणीचा सामना करत हे पीक घ्यावे लागते. नेमकं हे पीक घेताना कोणकोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते, त्याचा 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून घेतलेला हा आढावा...

हिंगोलीत मशरूमची शेती...

हेही वाचा - #CAA Protest : वंचित बहुजन आघाडी करणार राज्यभर आंदोलनं, ४ जानेवारीपासून सुरूवात

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात मशरूमची शेती केली जाते. सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील एमबीएचे शिक्षण पूर्ण करून नोकरीनिमित्त परराज्यात असलेल्या अकीब शेख यांनी आपले काका शेख मोबिन यांच्या मदतीने मशरूम शेती करण्यास सुरुवात केली. काकांचे शिक्षण हे केवळ दुसरीपर्यंत असले तरी अवजड कामे करण्यापेक्षा ही शेती करणे पुतण्याच्या मार्गदर्शनामुळे त्यांना अतिशय सोपे जात आहे. मात्र, मशरूमची शेती करत मशरूम ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे तर जिकरीचे आहेच. मात्र, त्याची निर्मिती करणे म्हणजे तारेवरची कसरत असून, समुद्रातून मोती शोधण्यासारखेच आहे. एका वर्षांत अनेक वाईट अनुभव आले. मात्र, तलाठी असलेल्या भावाने अन् त्याच्या मुलाने शेख मोबिन यांना वारंवार दिलेला दिलासा हा खूप काही सांगून जातो. ही शेती करत असताना आर्थिक बजेट हळूहळू वाढत जाते. परंतु, शेती सुरू करण्यासाठी जे अगोदर मार्गदर्शन केलं जातं ते नंतर होत नाही. बीज या शेतीसाठी अतिमहत्त्वाचे असतात. ते बीज बाहेर गावावरून मागवले जाते. ते वेळेवर येत नाही तर, कधी चुकीच्या पत्त्यावर जाते. यामध्ये बीज खराब होण्याचा देखील धोका असतो. भव्य असे शेड करून त्या बीजची प्रतिक्षा करावी लागते. बीज दाखल होताच त्याच्या प्रतीक्षेत असलेलं सोयाबीनचे कुटार त्याचे निर्जंतुकीकरण करून, त्यामध्ये ते टाकले जाते.

हेही वाचा - ''अभ्यासपूर्ण पध्दतीने नाटकाकडे पाहण्याचा प्रयत्न 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने व्हावा ही इच्छा''

या पिकाला वातावरण थंड असणे नितांत गरजेचे असते. एकीकडे 42 ते 43 अंशावर गेलेलं तापमान येथे केवळ कमीत कमी 22 अन् जास्तीत जास्त 25 अंश एवढे ठेवावे लागत असल्याचे शेख मोबिन यांनी सांगितले. एवढी मेहनत करून मशरूमचे उत्पादन काढल्यानंतर ते विक्रीला नेण्यासाठी मोठी करसत करावी लागत असल्याचे मोबिन सांगतात. हिंगोलीतील मशरूमला मुंबई, पुणे, नगर आदी ठिकाणी मागणी आहे.

मात्र, स्थानिक ठिकाणी या मशरूमचे गुणकारी महत्त्व अजूनही उमगलेच नसल्याने, पाहिजे तेवढ्या प्रमाणात याची मागणी येत नाही. ओली मशरूम 300 तर, वाळलेली मशरूम एक हजार रुपये प्रति किलोप्रमाणे मागणी होते. अशा अनेक संकटांवर मात करत शेख कुटुंब मशरूमची शेती करत करत टाकाऊ बेडपासून गांडूळ खत निर्मितीही करतात.

वास्तविक पाहता, मशरूम हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यापासून कुपोषण दूर होऊ शकते, त्यामुळे प्रशासन स्थरावर मशरूम कुपोषमुक्तीसाठी वापरण्याची परवानगी दिली तर निश्चितच हिंगोली जिल्ह्यातील मशरूम उत्पादकांना चांगले दिवस येतील आणि जिल्हाही कुपोषणमुक्त होऊन चिमुकल्यांचे आरोग्य ठणठणीत राहण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील मजुरांना रोजगार प्राप्त होऊन मशरूममुळे हिंगोली जिल्ह्याचे मागासलेपण पुसून जाईल हे मात्र नक्की.

या आजारावर उपयुक्त आहे मशरूम -

वाळलेल्या मशरूमपासून बनवलेली पावडर सर्दी व शरीरातील विविध आजार नाहीसे करते
मुतखडा, लिव्हर, किडनीसह प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी मशरूम संजीवनीच आहे

Intro:मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यातील काही सुशिक्षित तरुण शेतीला जोड व्यवसाय म्हणून मशरूमच्या शेतीकडे वळलेले आहेत. त्यानुसार मशरूम आता जिल्ह्यात चांगलेच प्रसिद्ध होत आहे. हे मशरूम आरोग्यासाठी गुणकारी असले तरीही पाहिजे तेवढी याची जनजागृती झालेली नाही. मात्र ही शेती करणे म्हणजे समुद्रातुन मोती काढल्या सारखेच असल्याचे कोळसा येथील लिमरा मशरूम उत्पादकांने सांगितलेय. अनंत अडचणीचा सामना करीत हे पिकघ्यावें लागते. नेमकं हे पीक घेताना कोणकोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते त्याचा ईटीव्ही भारत च्या माध्यमातून घेतलेला हा आढावा.

Body:हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात मशरूमची शेती केली जातेय. अशीच शेती सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील एमबीए शिक्षण पूर्ण करून नोकरी निमित्त परराज्यात असलेल्या अकीब शेख यांनी आपले काका शेख मोबिन यांच्या मदतीने मशरूम शेती करण्यास सुरुवात केलीय. काकाचे शिक्षण हे केवळ दुसरी पर्यंत असले तरी अवजड काम करण्यापेक्षा ही शेती करणे पुतण्याच्या मार्गदर्शनामुळे त्याना अतिशय सोपे जात आहे. मात्र मशरूमची शेती करत मशरूम ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे तर जिकरीचे आहेच. मात्र त्याची निर्मिती करणे म्हणजे तारेवरची कसरत असून, समुद्रातुन मोती शोधण्यासाठी सारखीच आहे. एका वर्षांत अनेक वाईट अनुभव आले मात्र, तलाठी असलेल्या भावाने अन त्याच्या मुलाने शेख मोबिन याना वारंवार दिलेल्या दिलासा हा खूप काही सांगून जातोय. मात्र ही शेती करीत असताना आर्थिक बजट तर हळूहळू वाढत जाते त्यात काही शंकाच नाही. मात्र शेती सूरु करण्यासाठी जे अगोदर मार्गदर्शन केलं जातं ते नंतर होत नाही. तर या शेतीसाठी अति महत्वाचे असतात ते बीज ते बाहेर गावावरून मागविले जाते. ते वेळेवर येत नाही तर कधी चुकीच्या पत्यावर जातंय, यामध्ये बीज खराब होण्याचा देखील धोका असतो. भव्य असे शेड करून त्या बीज ची प्रतीक्षा करावी लागते. बीज दाखल होताच त्याच्या प्रतीक्षेत असलेलं सोयाबीनच कुटार त्याचे निर्जंतुकिकरणं करून, त्यामध्ये ते टाकला जात. हे सर्व करीत असताना एवढी काळणी घ्यावी लागते की, त्याचा काही अंदाज च नाही. हिवाळ्याच्या दिवसात तरी काही नाही मात्र उन्हाळ्यात तर कसरतच असते. याला वातावरण थंड असणे नितांत गरजेचे असते. एकीकडे 42 ते 43 अंशावर गेलेलं तापमान येथे केवळ कमीत कमी 22 अन जास्तीत जास्त 25 अंश एवढे ठेवावे लागते. यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, हे शेख मोबिन यांनी सांगितले. एवढे करून मशरूमचे उत्पादन काढल्यानंतर ते विक्री साठी नेण्याची पंचायत. पर राज्यात क्विंटलाने मागतात मात्र अडथळा येतो तो आर्थिक बजटचा. चार ते पाच महिन्याने पैसे दिले जातात. हिंगोली तल्या मशरूम ला मुंबई, पुणे, नगर आदी ठिकाणी मागणी आहे.
मात्र स्थानिक ठिकाणी या मशरूम चे गुणकारी महत्व अजूनही उमगलेच नसल्याने, पाहिजे तेव्हड्या प्रमाणात मागणी येत नाही. ओली मशरूम तीनशे तर वाळलेली मशरूम एक हजार प्रति किलो प्रमाणे मागणी होतेय. मात्र हा सर्व,प्रवास थक्क करणारा आहे. पण हार न मानता शेख कुटुंब मशरूम ची शेती करत करत टाकाऊ बेड पासून गांडूळ खत निर्मिती करतेय. त्याचा शेतील उत्कृष्ट रित्या आधार होतोय.

Conclusion:वास्तविक पाहता मशरूम हे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. या पासून कुपोषण दूर होऊ शकते, त्यामुळे प्रशासन स्थरावर मशरूम कुपोषमुक्तीसाठी वापरण्याची परवानगी दिली तर निश्चितच हिंगोली जिल्ह्यातील मशरूम उत्पादकांना चांगले दिवस आल्या शिवाय राहणार नाहीत. अन जिल्हा ही कुपोषण मुक्त होऊन चिमुकल्याचे आरोग्य ठणठणीत राहण्यास मदडत होईल. अन जिल्ह्यातील मजुरांना रोजगार प्राप्त होऊन मशरूम मुळे हिंगोली जिल्ह्याचे मागासले पण पुसून जाईल. आज घडीला तीस ते चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळत असले तरी ते मिळविण्यासाठी काबाड कष्ट करावे लागतात.

*या आजारावर उपयुक्त आहे मशरूम*

वाळलेल्या मशरूम पासून बनविलेले पावडर हे सर्दी व शरीराततील विविध आजार नाहीसे करतेय

मुतखडा, लिव्हर, किडनी सह प्रोस्टेट कॅन्सर च्या रुग्णांसाठी संजीवनीच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.