ETV Bharat / state

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न - ST driver tried commit suicide

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बसस्थानकात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून एका वाहनचालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांने हा त्रास सर्वांना होत असल्याचा आरोपही त्या वाहन चालकाने केला.

driver of the vehicle tried to commit suicide after suffering the senior's trauma
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन वाहन चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Jan 8, 2020, 11:11 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील वसमत येथील बसस्थानकात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका वाहनचालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा त्रास सर्वांचा होत असल्याचा आरोपही त्या वाहन चालकाने केला आहे. मात्र, पुढे येण्यास सर्वजण घाबरतात. या प्रकाराने मात्र आगारात एकच खळबळ उडाली आहे. बाळू रामेश्वर मठपती अस या वाहन चालकांच नाव आहे.

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन वाहन चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

त्यांनी वसमत येथील आगारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शोले स्टाईलने सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सर्वांनी टाकीकडे धाव घेत, त्या वाहनचालकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही ही कुणाच ही काही ऐकून घेत नव्हता. वाहतूक निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या कडून होत असलेला त्रास जोरजोरात ओरडून सांगत होता. त्यामुळेच मी हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तो म्हणत होता, त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत होता. दरम्यान, काही जणांनी टाकीवर धाव घेऊन त्याला वाचविण्यात यश आले. येथील वाहतूक निरीक्षकाचा सर्वांनाच त्रास होतोय, या अधिकाऱ्यांकडे मात्र कोणाचे ही अजिबात लक्ष नाही. त्यामुळे वसमत बसस्थानकातील वाहक आणि चालकाना कोण संरक्षण देणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घटनास्थळी पीएसआय श्रीदेवी पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी रवि ढेंबरे व आदीनी धाव घेतली. आजून तरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या घटनेने जिल्ह्यातील वाहन चालक अन वाहकांना वरिष्ठांकडून होणारा त्रास समोर आलाय. आता यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:

हिंगोली- जिल्ह्यातील वसमत येथील बसस्थानकात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका वाहनचालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, हा त्रास सर्वांचा होत असल्याचा आरोपही त्या वाहन चालकाने केला आहे. मात्र पुढे येण्यास सर्वजण घाबरतात. या प्रकाराने मात्र आगारात एकच खळबळ उडालीय.

Body:बाळू रामेश्वर मठपती अस या वाहन चालकांच नाव आहे. त्यांनी वसमत येथील आगारात असलेल्या डपाण्याच्या टाकीवर चढून वरिष्ठांच्या जाचाला कंटाळू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शोले स्टाईलने सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सर्वांनी टाकीकडे धाव घेत, त्या वाहनचालकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही ही कुणाच ही काही ऐकून घेत नव्हता. वाहतूक निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या कडून होत असलेला त्रास जोरजोरात ओरडून सांगत होता. त्यामुळेच मी हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तो म्हणत होता, त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत होता. दरम्यान, काही जणांनी टाकीवर धाव घेऊन त्याला वाचविण्यात यश आले. येथील वाहतूक निरीक्षकाचा सर्वांनाच त्रास होतोय, या अधिकाऱ्यांकडे मात्र कोणाचे ही अजिबात लक्ष नाही. त्यामुळे वसमत बसस्थानकातील वाहक , आणि चालकाना कोण संरक्षण देणार ? असा प्रश्न निर्माण झालाय. Conclusion:घटनास्थळी पीएसआय श्रीदेवी पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी रवि ढेंबरे व आदीने धाव घेतली. आजून तरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या घटनेने जिल्ह्यातील वाहन चालक अन वाचकांना वरिष्ठांकडून होणारा त्रास समोर आलाय. आता यावर काय कारवाई होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाईट
वाहन चालक- बाळू मठपती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.