ETV Bharat / state

डॉक्टरांनी कर्तव्यापासून काढला पळ; हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात डॉक्टर परस्पर नियोजन करून कर्तव्य बजावत असल्याचे अनेकदा प्रकार घडले आहेत. मात्र, आरोग्य प्रशासनाने तेवढे गांभीर्याने घेतले नव्हते. परं0तु कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये डॉक्टर कर्तव्य बजावत नसल्याचे उघड झाले. एकाच डॉक्टरसोबत आर्थिक व्यवहार करून त्यांनाच कर्तव्यावर ठेवले जात होते.

डॉक्टरांनी कर्तव्यापासून काढला पळ; हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
डॉक्टरांनी कर्तव्यापासून काढला पळ; हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
author img

By

Published : Apr 20, 2020, 7:31 PM IST

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य प्रशासन जीवाचे रान करीत आहे. डॉक्टरदेखील जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावत आहेत. मात्र, हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात पाच ते सात डॉक्टर कर्तव्य पार पडत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या सर्व डॉक्टरांचा अहवाल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मागविला आहे.

हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात डॉक्टर परस्पर नियोजन करून कर्तव्य बजावत असल्याचे अनेकदा प्रकार घडले आहेत. मात्र, आरोग्य प्रशासनाने तेवढे गांभीर्याने घेतले नव्हते. परंतु कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये डॉक्टर कर्तव्य बजावत नसल्याचे उघड झाले. एकाच डॉक्टरसोबत आर्थिक व्यवहार करून त्यांनाच कर्तव्यावर ठेवले जात होते.

डॉक्टरांनी कर्तव्यापासून काढला पळ; हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

19 एप्रिल रोजी प्रसुती कक्षात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेवर एका डॉक्टरने उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच हा प्रकार एका दोन दिवसांचा नसून अनेक दिवसांपासून सुरू असल्याचेही समोर आले आहे. अतिरिक्त शल्यचिकित्सक राहुल डोंगरे यांनी दांडी मारलेल्या त्या डॉक्टरांना मेमे काढला आहे, तर या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी या दांडीबहाद्दर डॉक्टरांचा अहवाल मागविला. मात्र, महामारीच्या काळात डॉक्टर राबत आहेत. त्यामुळे त्यांना देवदूतच समजले जात आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात राबण्याऐवजी दांडी मारणाऱ्या डॉक्टराना काय नाव द्यावे हेच कळायला मार्ग नाही. भयंकर परिस्थितीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.