हिंगोली - शहरातील अंतुले नगर भागातील जिल्हा परिषद शाळेत एक पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापिकेत चक्क विद्यार्थ्यांसमोर झटापट झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर शिक्षकाच्या दिशेने मुख्याध्यापिकेने चप्पल भिरकावून मारली एवढेच नव्हे तर काही वेळाने शिक्षिकेचा पती, मुलगा अन् त्याच्या मित्राने शिक्षकास जबर मारहाण केली. त्यामुळे शिक्षकाच्याही तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने मात्र शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -पुण्यात शिवसेनेची बंडखोरी; कसब्यातून शिवसेना नगरसेवक उतरणार रिंगणात
ज्ञानेश्वर लक्ष्मण ठाकरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. माझ्या सांगण्याप्रमाणे तू शाळा का चालवत नाहीस, असे मुख्याधिपिकेने शिक्षकाला विचारल्याने शिक्षकाने मुख्याध्यापिकेस अश्लीश भाषेत शिवीगाळ केली अन् विनयभंग करत चापटाने मारहाण करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे मुख्यध्यापिकेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे, असे तक्ररीत म्हटले आहे.
प्रकरणात शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक पाहता शिक्षक शाळेत गेल्यानंतर मुख्याधिपिकेने कोणत्याही पुस्तकाचे पैसे घेऊ नका, यामुळे आपल्या शाळेची प्रतिमा मलिन होईल असे सांगत होते. तोच मुख्याधिपिकेने अरेरावी करत शिक्षकसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे आरोपी ठाकरेने सांगितले. जखमी शिक्षकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांसमोर घडल्याने एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्याचे तपसीक अमलदार पोउपनी गजानन पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - गायीच्या शेणापासून बनवले आंघोळीचे साबण, जाणून घ्या इतकी आहे किंमत