ETV Bharat / state

हिंगोंलीमध्ये दरोडेखोर समजून ग्रामस्थांनी आंध्र प्रदेश पोलिसांना डांबले - Hingoli Crime News

म्हाळशी येथील गणेश सीताराम गायकवाड यास 4 ते 5 जणांनी अचानक विचारपूस करून ताब्यात घेतले आणि त्याला मारत चारचाकी वाहनामध्ये टाकले. त्यावेळी या सर्व प्रकाराने म्हाळशी येथील ग्रामस्थ भयभीत झाले. गणेशच्या नातेवाईकांनी शेगाव येथील काही मित्रांना फोनवरून संपर्क साधला. तसेच गणेशला गाडीमध्ये मारत नेत असल्याची कल्पना दिली. त्यामुळे शेगाव-खोडके येथे गाडी पोहोचताच ग्रामस्थांनी गाडीला घेराव घातला.

दरोडेखोर समजून ग्रामस्थांनी आंध्र प्रदेश पोलिसांना डांबले
author img

By

Published : Nov 3, 2019, 10:34 PM IST

Updated : Nov 3, 2019, 10:43 PM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या म्हाळशी येथील गावात आंध्रा पोलिसांनी अचानक प्रवेश करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. अनं मारत-मारत त्याला आपल्या गाडीत डांबले. अचानक झालेल्या या प्रकाराने ग्रामस्थ भयभीत झाले. काही कळायच्या आता पोलीस गाडी घेऊन गेले. त्यामुळे म्हाळशी येथील ग्रामस्थांनी गाडी गेलेल्या मार्गावरील शेगाव-खोडके येथील काही ग्रामस्थांना कल्पना दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी शेगाव-खोडके येथे ही गाडी अडवली आणि दरोडेखोर समजून पोलिसांना एका खोलीत डांबले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी रिसोड आणि हिंगोली पोलिसांनी धाव घेतली आहे.

दरोडेखोर समजून ग्रामस्थांनी आंध्र प्रदेश पोलिसांना डांबले

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हाळशी येथील गणेश सीताराम गायकवाड यास 4 ते 5 जणांनी अचानक विचारपूस करून ताब्यात घेतले आणि त्याला मारत चारचाकी वाहनामध्ये टाकले. त्यावेळी या सर्व प्रकाराने म्हाळशी येथील ग्रामस्थ भयभीत झाले. गणेशच्या नातेवाईकांनी शेगाव येथील काही मित्रांना फोनवरून संपर्क साधला. तसेच गणेशला गाडीमध्ये मारत नेत असल्याची कल्पना दिली. त्यामुळे शेगाव-खोडके येथे गाडी पोहोचताच ग्रामस्थांनी गाडीला घेराव घातला. गाडीमधील सर्वांना ताब्यात घेत एका खोलीमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी चोकशी केली असता ते आंध्र प्रदेशातील पोलीस असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - हिंगोलीत वाघाच्या दहशतीने भीतीचे वातावरण; पंजाचे ठसे पाहून शोध सुरू

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्यामुळे आंध्रप्रदेश पोलिसांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. यावेळी ग्रामस्थ पोलिसांना दरो़डेखोर समजून मारहाण करत होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा जमाव गावात असल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. तर आंध्र प्रदेश पोलिसांना लोकांच्या तावडीतून सोडवण्यासाठी गेलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानांवरही ग्रामस्थांनी केली दगडफेक केल्याची धक्कादायक माहिती आहे. यामध्ये 3 जवान जखमी झाले आहेत. तर आंध्र प्रदेश पोलिसांना सोडणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट होत आहे.

हेही वाचा - 'त्या' तरुणीचा खून गळा आवळून, ओळख पटली

पोलिसांना पूर्वकल्पना न देता आंध्र प्रदेश पोलिसांचा हद्दीमध्ये प्रवेश -

अनेकवेळा आंध्रा पोलीस हे कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे त्यांच्यावर असे जीवघेणे हल्ले होतात. हा देखील प्रकार तसाच घडला आहे. सुदैवाने वेळेत माहिती मिळाली आणि पोलीस यंत्रणा तत्काळ कामाला लागली. जिल्ह्यात येताना पूर्व कल्पना देणे गरजेचे असल्याचे पोलीस निरिक्षक झुंजारे यांनी सांगितले. आंध्रा पोलिसांनी मात्र म्हाळशी येथील गणेश गायकवाडला नेमके कोणत्या गुन्ह्यातील चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, हे अद्याप कळू शकले नाही.

Intro:

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या म्हाळशी येथील गावात आंध्रा पोलीसानी अचानक प्रवेश करीत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. अन मारत मारत त्याला आपल्या गाडीत डांबले. अचानक झालेल्या या प्रकाराने ग्रामस्थ भयभीत झाले. काही कळायच्या आता त्यांनी गाडी ही जोराने दामटली. त्यामुळे म्हाळशी येथील ग्रामस्थांनी गाडी गेलेल्या मार्गावरील शेगाव खोडके येथील काही ग्रामस्थांना कल्पना दिली. त्यामुळे शेगाव खोडके येथे गाडी अडवली अन दरोडेखोर म्हणून सर्वांना एका खोलीत डांबले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी रिसोड अन हिंगोली पोलिसांनी धाव घेतलीय.

Body:म्हाळशी येथील गणेश सीताराम गायकवाड यास चार ते पाच जणांना अचानक विचारपूस करून ताब्यात घेतले अन त्याला मारत - मारत चारचाकी वाहनांमध्ये टाकले. अन घाईगडबडीत गावातून वाहन शेगाव खोडके मार्गे दामटले. या सर्व प्रकाराने म्हाळशी येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते. गणेश च्या नातेवाईकांनी शेगाव येथील काही मित्रांना फोनवरून संपर्क साधला गणेशला या गाडीमध्ये मारत मारत नेत असल्याची कल्पना दिली. त्यामुळे शेगाव खोडके येथे ही गाडी पोहोचताच ग्रामस्थांनी गाडीला घेराव घातला. गाडी मधील सर्वांना ताब्यात घेत एका खोलीमध्ये डांबून ठेवले. अन गोरेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी चोकशी केली तर हे आंध्र प्रदेशातील पोलीस असल्याचे समोर आले. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांनी समजून सांगत ताब्यात घेतलेले हे पोलीस कर्मचारी असल्याची माहिती दिली. अन झुंजारे यांनी मोठा पोलीस फोर्स शेगाव येथे पाठविला. त्यामुळे आंध्र प्रदेशातील पोलीस थोडक्यात बचावले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा जमाव गावात असल्याने गावाला छावणीचे स्वरूप आलेय तर आंध्र प्रदेशाच्या पोलिसांना लोकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानांवर ग्रामस्थांनी केली दगडफेक यामध्ये तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेतलेल्या आंध्रप्रदेशच्या पोलिसांना सोडणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय. त्यामुळे ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट होत आहे.

*Conclusion:आंध्रा पोलिसाचे हे नेहमीचेच*

कित्येकदा आंध्रा पोलिस हे कोणतीही पूर्वकल्पना न देता कोणत्याही जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे त्यांच्यावर असे जीवघेणे हल्ले होतात. हा देखील प्रकार तसाच घडलाय सुदैवाने वेळेत माहिती मिळाली अन पोलिस यंत्रणा तात्काळ कामाला लागलीय. जिल्ह्यात येताना पूर्व कल्पना देने गरजेचे असल्याचे पोनि झुंजारे यांनी सांगितले. आंध्रा पोलिसांनी मात्र म्हाळशी येथील गणेश गायकवाड ला नेमकं कोणत्या गुन्ह्यातील चौकशीसाठी ताब्यात घेतलय हे अद्याप कळू शकले नाही.
Last Updated : Nov 3, 2019, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.