हिंगोली - राष्ट्रीयकृत बँकेचे खासगीकरण ( Privatization of Nationalized Banks ) करण्याचा घाट केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. शिवाय ज्या शासकीय योजना राष्ट्रीयकृत बँकेतून बेरोजगाराना कर्ज उपलब्ध करून देतात, जर बँकाचे खासगीकरण झाले. तर निश्चितच नवे बेरोजगार कर्जपासून दूर राहतील. त्यामुळे हे खासगीकरण थांबवण्यासाठी संपूर्ण देशात राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संप ( Bank Employees Strike for Two Days ) पुकारला आहे. त्या संपात हिंगोली येथेही कर्मचारी सहभागी झाले होते. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील तीन हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
गाव तिथे बँक अशी काहीशी परिस्थिती असल्याने बँकेमुळे लहानातील लहान नवे उद्योजकाला तसेच शेतमजूर, पाणी टपरी वाला, लहान आठवडी बाजार, छोटा कारागीर या सर्वांना बँकेची पायरी चढता आली. मात्र आता त्याच बँका केंद्र सरकार खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे या बँकाचे जर खासगीकरण झाले तर खातेधारकला बँकेत खाते उघडण्यासाठी पाच ते दहा हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच लहान खातेधारकाना कर्ज मिळणे अवघड होणार आहे. चार्जेसच्या नावावर ग्राहकांचे शोषण केले जाईल. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना कमी व्याज दराने मिळणारे कर्ज बंद होऊन, सक्तीची कर्ज वसुली करत शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जातील, कर्जावरील व्याजदर बँका ठरवतील, शैक्षणिक कर्ज मिळणे दुरापास्त होऊन, सरकारी योजना राबविणे दुरापास्त होणार आहे. एवढेच नव्हे तर जनतेची बचत अन ठेवी असुरक्षित राहतील, अनुदानासाठी खाते उघडणे कठीण होईल, अशा अनेक अडचणींना तोंड ध्यावे लागणार आहे.
हेही वाचा - Rupali Thombre Joins NCP : अजित पवारांच्या उपस्थितीत रुपाली ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश