ETV Bharat / state

'मगो'सारखीच गोवा फॉरवर्डचीही अवस्था होईल - गिरीश चोडणकर - गोवा फॉरवर्ड

भाजप लोकांमध्ये जाऊन मते मागू शकत नाही. ते मतदानाला घाबरतात. कारण नितीमत्ता त्यांनी ठेवलेली नाही. लोकविश्वासाला पायदळी तूडवत आहेत. भविष्यात निवडणूक न लढवता आमदार पळवण्याचा धंदाच करतील. भाजपने मगोच्या बाबतीत केले. तेच गोवा फॉरवर्डच्या बाबतीत घडणार असल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.

काँग्रेसमध्ये प्रवेश करताना माजी आमदार प्रताप गावस
author img

By

Published : Mar 28, 2019, 1:11 PM IST

पणजी - भाजपने मगोच्या (महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी) सिंहावर बसून विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर मगोचे आमदार आणि मतदारही नेले. याला मगोचे नेतृत्व जबाबदार आहे. त्याबरोबर आज मगोची जी अवस्था झाली आहे. तीच भविष्यात गोवा फॉरवर्डची होणार असल्याचे वक्तव्य गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला. माजी आमदार प्रताप गावस यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

मतदारांनी दिलेला कौल नकारून मगोने भाजपला साथ दिली. त्याच जोरावर भाजपने त्यांचे आमदार फोडले. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. पैशाचा वापर करून भाजप खालच्या स्तरावरील घाणेरडे राजकारण करीत आहे. त्यामुळे देशात गोव्याची बदनामी होत आहे. भाजप ज्या पद्धतीने राजकारण करत आहे. त्याचा लाभ काँग्रेसला होणार आहेत. लोकांचा कौल नाकारत आमदार चोरी करत असल्याने त्यांचेच लोक नाराज होत आहेत. तसेच लोकही राग व्यक्त करत आहे, असे चोडणकर म्हणाले.

भाजप लोकांमध्ये जाऊन मते मागू शकत नाही. ते मतदानाला घाबरतात. कारण नितीमत्ता त्यांनी ठेवलेली नाही. लोकविश्वासाला पायदळी तूडवत आहेत. भविष्यात निवडणूक न लढवता आमदार पळवण्याचा धंदाच करतील. भाजपने मगोच्या बाबतीत केले. तेच गोवा फॉरवर्डच्या बाबतीत घडणार असल्याचे ते म्हणाले.

सरदेसांईंचे भाकित खरे ठरले-

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी मतभेद असले तरीही २०१७ च्या विधानसभा निवडणूक प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले होते, जो भाजपसोबत जाईल तो संपणार आहे. ते आता खरे होताना दिसत आहे. मगोने भाजपला पाठिंबा दिला नसता तर ही परिस्थिती आज ओढावली नसती, असेही चोडणकर म्हणाले.

माजी आमदार प्रताप गावस यांची 'घरवापसी' -

माजी आमदार प्रताप गावस यांना २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, बुधवारी त्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी त्यांचे स्वागत केले.

Intro:पणजी : भाजपने मगोच्या सिंहावर बसून विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर मगोचे आमदार आणि मतदारही नेले. याला मगोचे नेतृत्व जबाबदार आहे. त्याबरोबर आज मगोची जी अवस्था आझली आहे. तिच भविष्यात गोवा फॉरवर्डची होणार आहे, असा इशारा गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला. यावेळी माजी आमदार प्रताप गावस यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Body:येथील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले, मतदारांनी दिलेला कौल नकारून मगोने भाजपला साथ दिली. त्याच जोरावर भाजपने त्यांचे आमदार फोडले. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. पैशाचा वापर करून भाजप खालच्या स्तरावरील घाणेरडे राजकारण करत आहे. त्यामुळे देशात गोव्याची बदनामी होत आहे.
भाजप ज्या पद्धतीने राजकारण करत आहे. त्याचा लाभ काँग्रेसला होणार आहेत. लोकांचा कौल नाकारत आमदार चोरी करत असल्याने त्यांचेचे लोक नाराज होत आहेत. तसेच लोकही राग व्यक्त करत आहे, असे सांगून चोडणकर म्हणाले, भाजप लोकांमध्ये जाऊन मते मागू शकत नाही.ते मतदानाला घाबरतात कारण नितीमत्ता त्यांनी काहीच ठेवलेली नाही. लोकविश्वासाला पायदळी तूडलत आहेत. भविष्यात निवडणूक न लढविता आमदार पळविण्याचा धंदाच करतील.
आज जे भाजपने मगोच्या बाबत केले तेच गोवा फॉरवर्डच्या बाबतीत घडणार आहे, असे सांगून चोडणकर म्हणाले, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी मतभेद असले तरीही २०१७ च्या विधानसभा निवडणूक प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले होते की, जो भाजपसोबत जाईल तो संपणार आहे.ते आता खरे होताना दिसत आहे. जय मगोने भाजपला पाठिंबा दिला नसता तर ही परिस्थिती आज ओढावली नसती.
माजी आमदार प्रताप गावस यांची ' घरवापसी'
२०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार प्रताप गावस यांनी आपल्या समर्थकांसह आज काँग्रेस प्रवेश केला. काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना गावस म्हणाले, कोणत्याही अटींशिवाय प्रवेश केला आहे. तो प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊनच.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.