ETV Bharat / state

नववर्षाचे स्वागत बेतले जीवावर; गाढवी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

घटनेची माहिती अर्जुनी-मोरगाव आणि केशोरी पोलिसांना ( Keshori Police ) देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. तरुणाचा मृतदेह ( Rahul Pandhari Kalsarpe death ) शवविच्छेदनाकरिता अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

author img

By

Published : Jan 1, 2022, 4:31 PM IST

राहुल पंढरी काळसर्पे
राहुल पंढरी काळसर्पे

गोंदिया- नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नदीकाठी पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला प्राण गमवावे लागले आहेत. राहुल पंढरी काळसर्पे या 28 वर्षीय तरुणाचा गाढवी नदीत बुडून मृत्यू झाला ( youth drown in gondiyas Gadhavi river ) आहे.

मृत राहुल काळसर्पे हा अर्जुनी-मोरगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या महागाव येथील रहिवाशी होता. राहुल हा मोठा भाऊ रवी पंढरी काळसर्पे व काही मित्रांसोबत नदीकाठावर गेला होता. केशोरी येथून जवळच असलेल्या खोळदा येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबरला पार्टी करण्यासाठी गेले होते. जेवण तयार करून राहुल हा आपल्या मोठ्या भावासह व त्याच्या मित्रासोबत नदीच्या पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल बुडू लागला. तो पाण्यात दिसेनासा झाल्याने त्याच्या मोठ्या भावाने नदी काठा जवळील गावातील लोकांच्या मदतीने शोध घेतला. काही वेळाने राहुलचा मृतदेह ( Rahul Pandhari Kalsarpe death ) मिळाला.

हेही वाचा-Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांनी पकडले अडीच कोटीचे अमली पदार्थ

संपूर्ण महागावात शोककळा

घटनेची माहिती अर्जुनी-मोरगाव आणि केशोरी पोलिसांना ( Keshori Police ) देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची केशोरी येथे पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला २८ वर्षीय तरुणाचा ( Youth drown in Gadhavi river ) मृत्यू झाल्याने संपूर्ण महागावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा-Woman Suicide With Childrens Jalna : जालन्यात स्वतःच्या चार चिमुरड्यांसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.