गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथे अतिवृष्टी झाली असून या तालुक्यात अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली ते म्हसवानी दरम्यान सोमवारी असलेल्या नाल्यात एक युवक वाहून गेला होता. त्याचा मृतदेह काल (मंगळवार) सापडला आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास म्हसवाणी येथील कार्तिक सोमेश्वर गौतम (वय १८ वर्षे) हा युवक नाल्यात आंघोळ करण्यासाठी गेला होता. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला होता. स्थानिक नागरिकांनी शोधमोहिम हाती घेतली. तसेच प्रशासनाला यांची सूचना देली असता प्रशासना तर्फे तीव्र गतने शोधमोहीम चालविण्यात आली होती. मात्र रात्री पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शोध मोहीमेला थाकबविण्यात आले मात्र मृत्य देह मिळाला नाही काल (मंगळवार) पुन्हा सकाळ पासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली असुन सुमारे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कार्तिकचा मृतदेह मिळाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सडक-राजुने येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील किशोरी गावाजवळील धोबी नाल्यावरून २ ते ३ फूट पाणी वाहत असून या ठिकाणावरून वाहतूक बंद झाली आहे. या ठिकाणापासून तीन ते चार गावांचा संपर्क तुटलेला आहे. दमदार पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक मार्गांवर असलेल्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यात चिंचोली ते केशोरी, सिरोली ते माहुरकुडा, अरततोंडी ते परसवाडा, गवर्रा ते परसटोला, केशोरी ते वारव्ही, केशोरी ते खोळदा, बोरी ते महागाव या मार्गांचा समावेश आहे.