गोंदिया- पावसाळा सुरू होऊन जुलै महिना लागला असता तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. मुबलक पावसाविना खरिपातील पिकांची पेरणी झाली नाही. तिरोडा व गोंदिया तालुक्यातील १२५ गावातील भात पिकाचे रोवणीचे कामे खोळबंली आहेत. तर तिरोड तालुक्यात फक्त 5 टक्के भागातच पेरणी झालेली आहे. त्यामुळे आता पाऊस नाही झाला तर शेतकऱ्यांचे खरिपाचे हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे विहिर व बोरवेल आहेत, त्यांनी पेरणी केली आहे. मात्र, ज्याच्याकडे नाही ते अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कॅनलद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार विजय राहगडाले यांनी पुढाकार घेतला असून आज तिरोडा तालुक्यातील चार जलाशयाद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात आले.
दरवर्षी गोंदिया जिल्ह्यात जून महिन्यातच 50 शेतकऱ्यांची पेरणी होते. मात्र, यावर्षी समाधान कारक पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील तलावात सध्या 20 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे विभागाकडून कॅनेलद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी आमदार विजय राहगडाले यांच्याकडे करण्यात आली होती.
आमदार रहांगडाले यांनी आज पाटबंधारे विभाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून जलाशयात पिण्यायोग्य 15 टक्के पाणी ठेऊन उर्वरीत पाणी शेतीसाठी देण्याच्या सूचना केल्या. तिरोडा तालुक्यातील चोरखमारा, खडबंधा, बोदलकास, धापेवाडा या चार जलाशयातील पाणी आज शेतीसाठी सोडल्याने आले.