ETV Bharat / state

गोंदियात हजारो कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

author img

By

Published : Jan 8, 2020, 5:08 PM IST

अंशदायी पेन्शन योजना लागू करताना सरकारने कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे, राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरिता गोंदिया जिल्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी उप विभागणी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

gondia
धरणे आंदोलनाचे दृश्य

गोंदिया - नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करून १९८२ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. या मागणीसाठी गोंदियात आज सर्वच विभागाचे कर्मचारी गोंदिया उप विभागीय अधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येत धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

धरणे आंदोलनाबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

सुधारणा या गोडस नावाखाली सरकारने १९८२ ची जुनी पेन्शन योजना बंद करून १ नोव्हेंबर २०१५ ला अंशदायी पेन्शन योजना लागू केली होती. त्यामुळे, कर्मचार्‍यांचे भविष्य असुरक्षित झाले आहे. सरकारने समान काम-समान वेतन या नितीला मुठमाती देऊन नवे-जुने कर्मचारी, असा भेदभाव सुरू केला. त्याचबरोबर, अंशदायी पेन्शन योजना लागू करताना शासनाने कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे, राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरता गोंदिया जिल्ह्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी उप विभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यात पोलीस विभागातील कर्मचारी देखील उपस्थित होते. १ नोव्हेंबर २०१५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कार्यलयासमोर आपला मागण्या घेऊन एकत्र येत धरणे आंदोलन केले. मात्र, याचा फटका शासकीय कार्यलयात ग्रामीण भागातून कामाकरता येणाऱ्या लोकांना बसला आहे.

हेही वाचा- रानडुकराची शिकार करणार्‍या दोघांना अटक

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 08-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_08.jan.20_01_old pension aandolan_7204243
टीप :- ही बातमी रेड टू युज करून पाठवली आहे
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या गोंदियात हजारो कर्मचाऱ्यांनी
उप विभागीय अधिकाऱ्यांरी कार्यलया समोर केले धरणे आंदोलन
Anchor :- नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करून १९८२ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. या मागणीसाठी गोंदियात आज सर्वच विभागाचे कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी गोंदिया उप विभागणी अधिकारी कार्यालयावर हजारोच्या संखेत धडकले होते. सुधारणा या गोंडस नावाखाली शासनाने १९८२ ची जुनी पेन्शन योजना बंद करून १ नोव्हेंबर २०१५ रोजी अंशदायी पेन्शन योजना लागू केली. त्यामुळे कर्मचार्‍यांचे भविष्य असुरक्षित झाले असून .समान काम-समान वेतन या शासनाच्या नितीला मुठमाती देऊन नवे-जुने कर्मचारी असा भेदभाव सुरू केला असून अंशदायी पेन्शन योजना लागू करताना शाशनाने कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीकरिता गोंदिया जिल्यातील पोलिश विभागातील कर्मचारी हि उपस्थित झाले होते. १ नोव्हेंबर २०१५ नंतर लागले कर्मचारी उपविभागीय कार्यलयासमोर आपला मागण्या घेऊन एकत्र येत धरणे आंदोलन केले मात्र याचा फटका शासकीय कार्यलयात ग्रामीण भागातून कामा करिता येणाऱ्या लोकांना बसला आहे.
01to01 :- ओमप्रकाश सपाटे, (ईटीव्ही भारत, गोंदिया )Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.