ETV Bharat / state

जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्यास नागपूर खंडपीठाचा नकार; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी - नागपूर उच्च न्यायालय खंडपीठ न्यूज

जेईई आणि नीटची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. नागपूर खंडपीठाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी जाऊ शकत नाही.

Students
विद्यार्थी
author img

By

Published : Sep 1, 2020, 1:01 PM IST

गोंदिया - आज होत असलेली जेईई आणि नीटची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. नागपूर खंडपीठाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी नाराज आहेत.

जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्यास नागपूर खंडपीठाचा नकार

विदर्भाच्या पूरग्रस्त भागातील जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. आज होत असलेल्या जेईई परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तातडीची सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि पुष्प गानेदीवाला यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा दिला नाही. ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत, तिथे पूर नाही. जर एखादा विद्यार्थी पोहोचू शकला नाही तर त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत रिप्रेझेन्टेशन करावे, त्यावर एनटीए निर्णय घेईल. कोणाचेही नुकसान होणार नाही. मात्र, परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्व विदर्भात सध्या पूरस्थिती आहे. परिक्षेसाठी नागपूरला जाण्यासाठी वाहतूक मार्ग सुरू नाहीत. शासनाने या भागातील विद्यार्थ्यांना वाहतुकीची विशेष सुविधाही दिलेली नाही. अशा परिस्थितीत परीक्षा कशी देणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.