गोंदिया- लॉकडाऊनमुळे मजुरी करून पोट भरणाऱ्यांचे हाल होत आहे. शासनाकडून मजुरांना तांदूळ, दाळ इतर धान्य दिले जात आहे. मात्र, तिखट, मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. त्यामुळे, ही गरज जाणून जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक गुप्ता यांनी मजुरांना एक किलो तेल, मीठ, तिखट, हळद आदी मसाल्यांचे वाटप केले आहे. लॉकडाऊन उठल्यावरही आपण गर्जूंना मदत करत राहू, असे अशोक गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी