गोंदिया - नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात महात्त्वाचा वाटा असलेल्या मालमत्ता कर वसुलीची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यााच परिणाम विकास कामांवर होत आहे. 11 कोटींच्या मालमत्ता कराची वसुली अद्याप बाकी आहे. कर वसुलीसाली नगर परिषदेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या 10 डिसेंबरपर्यंत मालमत्ता थकबाकीदारांना कर भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा थकीत रकमेवर 24 टक्के व्याज लावून, कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या थकबाकीदारांमध्ये शासकीय कार्यालयांचा देखील समावेश आहे. यामध्ये बँक, पेट्रोल पंप, बीएससनल, एटीएम, शाळा व माहाविद्यालये यांना देखील थकबाकी भरण्यास सांगण्यात आले आहे. थकबाकी न भरल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.
मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ
मालमत्ता कर हा नगर परिषदेचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. मात्र त्याची वसुली वेळत होत नसल्याने, नगर परिषदेची डोकेदुखी वाढली आहे. अनेक गाळ्यांचे भाडे थकले आहे. कर देण्यासाठी व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याने, नगर परिषदेचे आर्थिक स्त्रोत मंदावले आहे. याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत असल्याने, अखेर नगर परिषदेकडून कराच्या वसुलीसाठी कडक पाऊले उचलण्यात आले असून, येत्या 10 डिसेंबरपर्यंत कर भरण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा नगर परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.