ETV Bharat / state

हाजराफॉल धबधबा पर्यटनासाठी खुला करा, नागरिकांची मागणी - hajrafall tourism

कोरोनामुळे आज हा धबधबा बंद झाला आहे. त्यामुळे, नागरिकांचा रोजगार हिरावला असून आज त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे, हाजराफॉल धबधबा लवकरात लवकर सुरू करून पुन्हा रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील वनव्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केली आहे.

हाजराफॉल
हाजराफॉल
author img

By

Published : Aug 22, 2020, 7:56 PM IST

गोंदिया- जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील निसर्गरम्य वनाने नटलेल्या भागात ब्रिटिशकालीन हाजराफॉल धबधबा वसलेला आहे. मुसळधार पावसामुळे हा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. मात्र, कोरोनामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी खुला नसल्याने पर्यटकांची निराशा होत आहे. तर धबधब्यातील पर्यटनावर परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, तो सुद्धा बंद असल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे, शासनाने धबधबा पर्यटनासाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व लोक व वन व्यवस्थापन समितीने केली आहे.

माहिती देताना स्थानिक

जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातून जाणाऱ्या मुबई-हावडा रेल्वे मार्गावरील कुवाढास नाल्याला अडवून ब्रिटिशकालीन इंजिनिअर हाजरा यांनी १९११ साली या धबधब्याची निर्मिती केली होती. तेव्हापासून या धबधब्याला हाजराफॉल असे नाव देण्यात आले. या धबधब्याचा उपयोग पर्यटनासाठी करता यावा व त्यातून या भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वन विभागाने गावातील लोकांची एक वन व्यवस्थापन समिती तयार केली होती. व या ठिकाणी आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.

वर्षभर या ठिकाणी मध्यप्रदेश, छत्तीसगड, व महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती अशा अनेक जिल्ह्यांमधून लोखोंच्या संख्येने पर्यटक येतात व निसर्गाच्या सुंदरतेचा आनंद घेतात. मोठ्यांबरोबर लहान मुलांचे देखील मन रमावे यासाठी या ठिकाणी चिल्ड्रन्स पार्क देखील तयार करण्यात आले आहे. तसेच, धबधब्याचा आनंद जवळून घेण्यासाठी झिपलाईन (रोप वे) ची निर्मिती देखील करण्यात आली आहे. मात्र, कोरोनामुळे आज हा धबधबा बंद झाला आहे. त्यामुळे, नागरिकांचा रोजगार हिरावला असून आज त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे, हाजराफॉल धबधबा लवकरात लवकर सुरू करून पुन्हा रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील वनव्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.