ETV Bharat / state

गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, चालक फरार

गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून चालक फरार झाला आहे.

author img

By

Published : May 16, 2019, 3:46 PM IST

घटनास्थळाचे दृश्य

गोंदिया - तालुक्यातील मुंडीपार या गावाजवळ ट्रकच्या धडकेत एक मोटरसायकल चालकच्या जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दुपारच्या वेळी घडला. रवी गुलाब राणे (रा.सेजगाव खुर्द) असे धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनास्थळाचे दृश्य

रवी हा पाहुण्यांना घेण्यासाठी मुंडीपार बस स्टँडवर आपल्या मोटरसायकल (एम-एच-३१-एफ-डी ६७०८) ने जात असताना समोरून विरुद्ध दिशेने येणारा ट्रक (क्रमांक सी-जे-०७-सी-ए-५३१४) ने धडक दिल्याने रवीचा जागीच मृत्यू झाला. ट्रकमध्ये धान भरलेला असून तो गोंदियाहून मुंडीपार येथील एमएडीसीकडे जात होता.
अपघात होताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी ट्रक चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक चालकाने घटना स्थळावरून पळ काढली. यावेळी गावकऱ्यांनी ट्रकची तोडफोड केली. तसेच ट्रकला आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ट्रकला लावलेल्या आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे ट्रकमध्ये भरलेल्या धानाचे नुकसान झाले नाही.

दरम्यान, ट्रकचालकाविरोधात गंगाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. तर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 16-05-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GONDIA_16.MAY.19_TRUCK MOTORCYCLE ACCIDENT 1 DATE
ट्रक च्या धडकेत मोटरसायकल सवार जागीच ठार
Anchor :- गोंदिया तालुकयातील मुंडीपार या गावाजवळ आज दुपारच्या वेळेस ट्रक च्या धडकेत मोटरसायकल चालक एका युवक जागीच ठार झाला आहे. मृतक रवी गुलाब राणे हा सेजगाव खुर्द इथे राहत असुन तो पाहुण्यांना घेण्या करीत मुंडीपार बस स्टेन्ड वर आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच ३१ फडी ६७०८ ने जात असताना समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक सी जे ०७ सी ए ५३१४ ने धडक दिल्याने मोटरसायकल सवार रवी चा जागीच मृत्यू झाला ट्रक मध्ये धान भरलेला असून तो गोंदिया कडून मुंडीपार येथील एमएडीसी कडे जात असताना हा अपघात झाला. अपघात होताच परिसरातील लोकांनी अपघात झाल्या ठिकाणी धाव घेतली असता व ट्रक चालक ला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक चालक घटना स्थळावरून पळ काढली मात्र गावकऱ्यांनी अपघातात रवी ठार झाल्या गावकर्यांनी ट्रक ची तोड फोड केली व ट्रक ला आग लावण्याचे प्रयत्न केले मात्र घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी ट्रक ला लावण्यात आलेल्या आगीवर नियंत्रण मिळवल्या मुळे ट्रक मध्ये भरलेल्या धानाचा नुकसान झालेला नाही. ट्रक चालक विरोधात गंगाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असुन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत सदर मृतदेह सविच्छेदना करिता गोंदिया जिल्हा रुग्नालयात पाठविण्यात आले. Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.