ETV Bharat / state

गोंदियात बीएसएनएलची 'बत्ती' गुल; ४४ लाखांच्या थकीत वीज बिलामुळे 70 टाॅवर पडले बंद - 70 BSNL Towers off out of 125 gondia

यंदा महावितरण विभागाने गोंदिया, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यात बीएसएनएलला दणका दिला आहे. महावितरणने १२५ टॉवर पैकी ७० टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे संपुर्ण तालुक्यातच बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

MSCDCL Cuts BSNL's electricity in gondia; 70 towers off out of 125
गोंदियात बीएसएनएलची बत्ती गुल
author img

By

Published : Dec 12, 2019, 10:01 AM IST

गोंदिया - विद्युत बिल न भरल्याने भारतीय दूर संचार निगमला (बीएसएनएल) महावितरण विभागाने पुन्हा जोराचा झटका दिला आहे. महावितरणने जिल्ह्यातील बीएसएनएलच्या शहर आणि ग्रामीण भागातील १२५ टॉवर पैकी ७० टॉवर बंद केले. तर काही एक्सचेंजची बत्ती ही गुल केली आहे. बीएसएनएलची सुमारे ४४ लाखांच्या घरात थकबाकी असल्याने महावितरणने हे पाऊल उचलले आहे. मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू आहे. वीज बिलांची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. यानंतर बीएसएनएलकडून पैसे भरले जातात. मात्र, काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी लागते.

गोंदियात बीएसएनएलची बत्ती गुल

यंदा महावितरण विभागाने गोंदिया, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यात बीएसएनएलला दणका दिला आहे. महावितरणने १२५ टॉवर पैकी ७० टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे संपुर्ण तालुक्यातच बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. तसेच इंटरनेट पूर्णपणे बंद झाल्याने याचा फटका बँकांनाही बसत आहे. कधी काळी बीएसएनएलचे सीम किंवा टेलीफोन कनेक्शन घेण्यासाठी नागरिकांना प्रतिक्षेत रहावे लागत होते. मात्र, खासगी कंपन्या बाजारात आल्याने त्यातच शासनाने बीएसएनएलकडे दुर्लक्ष झाल्याने बीएसएनएलकडे पाठ फिरवली आहे.

हेही वाचा - ..न भरलेल्या १ लाख ४४ हजारांचे बिंग फुटू नये म्हणून जाळले एटीएम

महावितरण आणि बीएसएनएलच्या कचाट्यात सर्वसामान्यांना अडचण होत आहे. 2 दिवसांपुर्वी शहरातील 3 कनेक्शन कापण्यात आले आहे. तसेच जवळपास ७० टॉवरची बत्ती गुल केली आहे. सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज आज ऑनलाईन झाले आहे. कार्यालयांमध्ये बीएसएनएलतर्फे इंटरनेट सुविधा दिली जाते. मात्र, वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प असल्याने शासकीय कार्यालयांचे कामे सुध्दा ठप्प झाल्याचे चित्र आहे. तसेच बीएसएनएलकडून वारंवार बिलाची रक्कम थकविली जात असल्याने महावितरणला त्यांची वीज कापणे हाच पर्याय उरतो. मात्र, याचा फटका सर्वसामान्य, बँका यांना बसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले; ग्राहकांना दिलासा, तर शेतकरी हवालदिल

या तालुक्यांमध्ये आहे इतकी थकबाकी -
गोंदिया (शहर) - 4 लाख
तिरोडा - 19 लाख
अर्जुनी मोरगाव - 18 लाख
सडक अर्जुनी - 3 लाख
एकूण - 44 लाख

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 11-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia  
File Name :- mh_gon_11.dec.19_bsnl office cut electricity power_7204243
बीएसएनएलची बत्ती गुल
१२५ टॉवर पैकी ७० टॉवर बंद : सुमारे ४४ लाखांची थकबाकी
Anchor :- भारतीय दुर संचार निगमला (बीएसएनएल)  विद्युत बिल न भरल्याने महावितर विभागाने पुन्हा जोर का झटका देत बीएसएनएल विभागाची बत्ती गुल केली आहे. महावितरणने जिल्ह्यातील बीएसएनएल च्या शहर व ग्रामीण भागातील १२५० टॉवर पैकी ७० टॉवर बंद असुन काही एक्सचेंज ची बत्ती हि गुल केली आहे. तसेच बीएसएनएलची यंदा थोडीफार नव्हे तर सुमारे ४४ लाखांच्या घरात थकबाकी असल्याने महावितरण विभागाने पुन्हा हे पाउल उचलावे लागले आहे. मागील वर्षभरापासुन बीएसएनएलची ही घरघर सुरू असुन वीज बिलांची रक्कम थकवुन ठेवत असल्याने महावितरण विभाग वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. वीज पुरवठा खंडीत केल्यावर बीएसएनएल कडुन पैसे भरले जाते. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा विज बिल थकविल्याने महावितर विभागाला त्यांची बत्ती गुल करावी लागते. 
VO :- यंदा महावितरण विभागाने गोंदिया, तिरोडा, अर्जुनी/मोरगाव व सडक/अर्जुनी तालुक्यात बीएसएनएलला दणका दिला आहे. महावितरणन १२५ टॉवर पैकी ७०  टॉवरची बत्ती गुल केली असुन यामुळे या संपुर्ण तालुक्यातच बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. तसेच इंटरनेट पूर्ण पणे बंद झाल्याने याचा फटका बैंकांना हि लागत आहे. कधी काळी बीएसएनएलचे सीम किंवा टेलीफोन कनेक्शन घेण्यासाठी नागरिकांना वेटींगवर रहावे लागत होते. मात्र खासगी कंपन्या बाजारात आल्याने त्यातच शासनाने बीएसएनएल कडे दुर्लक्ष झाल्याने आज नागरिक बीएसएनएलची सीम व टेलीफोन कनेक्शन बंद करीत आहे. वीज कनेक्शन कापल्यावर पैसे भरावे व त्यानंतर पुन्हा काही महिन्यांचे बिल थकवुन ठेवले जात असल्याने पर्याया अभावी महावितरण कनेक्शन कापत आहे. सततच्या या प्रकारामुळे मात्र महावितरण व बीएसएनएलच्या कचाट्यात सर्वसामान्यांना अडचण होत आहे. दोन दिवसांपुर्वी गोंदिया शहरातील तीन कनेक्शन कापण्यात आले असुन बीएसएनएलवर सुमारे ४ लाखांची थकबाकी आहे. तिरोडा तालुक्यात सुमारे १९ लाखांची थकबाकी , अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुमारे १८ लाखांची थकबाकी, सडक अर्जुनी तालुक्यात सुमारे ३ लाखांची थकबाकी असल्याने महावितरण विभागाने ७० टॉवर च्या जवळ पास ची बत्ती गुल केली आहे. अशाप्रकारे सुमारे ४४ लाख रूपयांची बीएसएनएल वर थकबाकी असल्याची माहिती आहे.BYTE :- निशांत राऊत (बीएसएनएल युजर)  पांढरा शर्ट घातलेला
BYTE :- मिथुन वणवे (बीएसएनएल युजर)  काळ्या रंगाचा शर्ट घालेल 
BYTE :- राहुल बोधने ( बीएसएनएल अधिकारी गोंदिया )
VO :- सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज आज ऑनलाईन झाले आहे. तर कार्यालयांमध्ये बीएसएनएल तर्फे इंटरनेट सुविधा दिली जाते. मात्र वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प असल्याने शासकिय कार्यालयाचे कामे सुध्दा ठप्प झाल्याचे चित्र आहे. तसेच बीएसएनएल कडुन वारंवार बिलाची रक्कम थकविली जात असल्याने महावितरणला बत्ती गुल करणे हाच पर्याय उरतो. यात मात्र बीएसएनएल मोबाईल, टेलीफोन व इंटरनेट सेवा वापरणा-यांना याचा फटका बसत आहे. यात शासकिय व खासगी कार्यालयांसह व्यापारीही कचाट्यात येत आहेत. आज सर्वच कामकाज ऑनलाईन झाल्याने व त्यातच इंटरनेट सेवा बंद पडत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य सहन करीत आहेत.Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.