भंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवळे यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलला सोशल डिस्टनस ठेऊन अधिकऱ्याची बैठक घेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता. मात्र, जिल्हाधिकारी बलकवळे यांनी खासदार सुनील मेंढे यांना जिल्हाबंदीचा नियम सांगत बैठक घेण्यास सहमती दिली नाही.
मात्र, आज राज्यसभा सदस्य खासदार प्रफुल पटेल हें रेड झोन असलेल्या मुबई येथून बाय रोड गाडीने ग्रीन झोन होत ऑरेंज झोन गोंदिया जिल्ह्यात आले. तसेच जिल्हाधिकारी बालकवळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना 20 एप्रिलला दुपारी दोन तास बैठकीसाठी वेळ दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी हे सत्ताधारी पक्षाला वेळ देत आहेत. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवळे या विरोधी पक्षाच्या लोकांना वेळ देत नसल्याची तक्रार खासदार सुनील मेंढे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.