गोंदिया - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन वाढवण्यात आले. मात्र, विविध ठिकाणी कंपन्या तसेच ऑफिसेस बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. सरकार काही दिवसांनी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथीलता आणणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यानंतर राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावानुसार विविध जिल्ह्यांचे झोन करण्यात आले आहेत. सर्वाधिक प्रभाव असलेला रेड झोन असून या खालोखाल ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन आहेत.
राज्यातील ग्रीन आणि आरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमधील उद्योग आजपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया ऑरेंज झोनमध्ये असल्याने गोंदिया जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण मिळाला होता. मात्र तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यतील तिरोडा तालुक्यत असलेल्या अदानी पॉवर प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणत मजूर कामाला येत आहेत. त्यांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टन्सचे पालन या ठिकाणी करण्यात येत आहे. सॅनिटायझर आणि हॅन्डवॉश देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.