ETV Bharat / state

मारबत विसर्जनासाठी गेले अन् परत नाही आले, चार युवकांचा नदीत बुडून मृत्यू - four youths drowned in the river

आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील वाघ नदीपात्रात चार युवक वाहून गेल्याची घटना घडली. ही घटना आज (मंगळवार, 7 सप्टेंबर)रोजी सकाळच्या सुमारास घडली. संतोष अशोक बहेकार (19), रोहित नंदकिशोर बहेकार (18) मयूर अशोक खोब्रागडे (21) आणि सुमित दिलीप शेंडे (16) अशी वाहून गेलेल्या युवकांची नावे आहेत. हे सर्व रा. कालीमाटी ता. आमगाव येथील आहेत.

नदीत बुडून मृत्यू झालेल्या चार तरुणांचा एकत्रीत फोटो

author img

By

Published : Sep 7, 2021, 11:49 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील वाघ नदीपात्रात चार युवक वाहून गेल्याची घटना घडली. ही घटना आज (मंगळवार, 7 सप्टेंबर)रोजी सकाळच्या सुमारास घडली. संतोष अशोक बहेकार (19), रोहित नंदकिशोर बहेकार (18) मयूर अशोक खोब्रागडे (21) आणि सुमित दिलीप शेंडे (16) अशी वाहून गेलेल्या युवकांची नावे आहेत. हे सर्व रा. कालीमाटी ता. आमगाव येथील आहेत. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाकडून शोधकार्यास सुरूवात झाली.

घटनेबद्दल माहिती देताना उप विभागीय अधिकारी आणि नातेवाईक

'अंघोळीसाठी नदी पत्रात उतरले'

आज सकाळच्या सुमारास हे युवक आणि काही मित्र मारबत विसर्जनासाठी गावाजवळील वाघ नदीच्या मुंडीपार येथील घुबडघाट काठावर गेले होते. दरम्यान, हे मित्र अंघोळीसाठी नदी पत्रात उतरले. मात्र, आंघोळीचा बेत या सात पैकी चार मित्रांच्या जीवावर बेतला. पाण्याचा अंदाज चुकल्याने संतोष, रोहित, मयूर आणि सुमित हे पाण्यात बुडाले. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना त्यामध्ये यश आले नाही.

'सायंकाळ झाल्याने शोध कार्याला थांबवले'

घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. या दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आमगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत. बचाव व शोधकार्य सुरू केले. मात्र, सायंकाळ झाल्याने शोध कार्याला थांबवण्यात आले. मात्र, सायंकाळपर्यंत एकही मृत देह मिळालेला नाही. शोधकार्य सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.