ETV Bharat / state

गोंदिया : गडचिरोलीला जाणारी दारू जप्त, 4 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत - गोंदिया पोलीस बातमी

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी-विदेशी नेताना दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या विक्रेत्याकडून त्यांनी ही दारू घेतली होती त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gondia crime news
gondia crime news
author img

By

Published : Jul 25, 2020, 5:10 PM IST

गोंदिया - दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत देशी-विदेशी दारू नेण्यात येत होती. ही दारु चारचाकी वाहनासह स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. 24 जुलै) 4 लाख 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस दलाकडून अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी धडक कारवाई मोहिम राबविण्यात येत आहे. या दरम्यपान गोंदिया जिल्ह्यातील केशोरी येथून एका चारचाकीत गाडीत देशी-विदेशी दारू दारूबंदी लागु असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन चिचटोला परिसरात गुन्हे शाखेकडून नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी केशोरीहून एक चारचाकी (क्र. एम एच 31 सी एस 1776) आली. त्यास थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये विविध कंपनीची दारु आढळली. देशी-विदेशी दारू व चारचाकी वाहन, असा एकुण 4 लाख 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

आरोपी मधुकर बाबुराव कापसे (वय 51 वर्षे), कुंदन जयदेव पदा (वय 20 वर्षे, दोघे रा. वडेगाव ता. आरमोरी जि. गडचिरोली) यांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी ही दारू विष्णू तक्तानी (रा. केशोरी ) याच्या दुकाातून खरेदी केल्याचे सांगितले. सर्व आरोपी यांचेवर केशोरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई, 77 अ सहकलम, भा.दं.वि.च्या कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.