ETV Bharat / state

गोंदियात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवा; नाना पटोलेंच्या सूचना

author img

By

Published : Oct 6, 2020, 9:11 PM IST

आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हाधिकारी तसेच वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना, आरोग्य यंत्रणेने बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करावेत. सोबतच मृत्यूदर कमी करण्यासाठी काम करावे, असे सांगितले.

गोंदिया
गोंदिया

गोंदिया - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा सातत्याने वाढणारा आकडा घटत असल्याने सर्वांनाच काहीसा दिलासा मिळाला आहे. आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हाधिकारी तसेच वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना केली. रुग्णालयांचा आढावा घेताना त्यांना काही त्रुटी दिसून आल्या. त्यांचा लवकरात-लवकर निपटारा न केल्यास वैद्यकीय अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सकांवर गुन्हा दाखल करू, अशी तंबीदेखील पटोले यांनी दिली.

प्रत्येकाने वेळीच सावध होऊन कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. १५ ऑक्टोबरनंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने विविध यंत्रणांना सोबत घेऊन आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश पटोले यांनी दिले.

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी

आरोग्य यंत्रणेने बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करावेत. सोबतच मृत्यूदर कमी करण्यासाठी काम करावे. जिल्ह्यातील बाधित रुग्ण उपचारातून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना आजाराशी लढा देण्यासाठी प्रशासनाने नवीन अधिकारी नेमून दिले आहेत. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी ऊर्जेने काम करावे. त्याचप्रमाणे संसाधनांचीही उपलब्धता करून देण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड असलेल्या व्यक्तींना मोफत उपचार मिळत असल्याची माहिती लोकांपर्यंत आरोग्य विभागाने पोहोचवावी. तसेच खासगी रुग्णालयांकडून आवश्यक तेवढ्याच बिलाची आकारणी व रुग्णांची समस्या सोडविण्यासाठी आणि खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची या काळात लूट होणार नाही, याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. खासगी रुग्णालयांचे सनियंत्रण करावे. नागरिकांची किंवा रुग्णाची तक्रार येणार नाही. रुग्णालयाच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच बाहेर डिस्प्ले बोर्ड लावावेत. त्यामुळे नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होईल. २४ तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षात तक्रार करणाऱ्या नागरिकांना संपूर्ण माहिती दिली जावी, असे निर्देश विधासभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीत दिले.

हेही वाचा - वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा इटियाडोह कालव्यात बुडून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.