गोंदीया - गोरेगाव तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या पाथरी येथील सरपंच ममता जनबंधू यांचे पती मानेश्वर दासराम जनबंधू यांना 800 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सिंचन विहीर मंजुर झालेली होती. त्या सिंचन विहीरीच्या बांधकामाकरता स्वत: खर्च केलेला होता. त्या खर्चाचे 22 हजार 17 रुपयाचा धनादेश काढण्याकरता तो ग्रामपंचायतीकडे गेलेला होता. ग्रामसेवक राणे यांनी धनादेश तयार असून सरपंच याची स्वाक्षरी होणे बाकी आहे. आपण घरटॅक्सचा भरणा करुन घ्या. धनादेशावर स्वाक्षरी करता सरपंच यांचे पती मानेश्वर जनबंधू यांच्याकडे धनादेश दिल्याची माहिती दिली.
हेही वाचा - देवरीमधील स्टील कंपनीला आग, सात कामगार भाजले
यानंतर सरपंचांचे पतीने धनादेशावर स्वाक्षरी घेतली आहे. त्या मोबदल्यात 1 हजार रुपयाची मागणी केली. ती रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाने सापळा रचून सरंपच ममता जनबंधू यांचे पती मानेश्वर जनंबधू यांना तडजोडीनंतर 800 रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. गोरेगाव पोलीस ठाण्यात कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - गोंदियात बोलेरो-मोटरसायकलचा अपघात, ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू