गोंदिया - जिल्ह्यातील देवरी येथे राष्ट्रीय महामार्गावर पान पराग पान मसाल्याची अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर देवरी पोलिसांनी कारवाई केली आहे. या ट्रकमधून 25 लाख 17 हजार 600 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी चालक हसन सलेमान रुखडा (40) आणि क्लीनरला अटक करण्यात आली.
हेही वाचा - तक्रार ३ लाखांच्या चोरीची, पोलिसांनी पकडला 22 लाखांचा माल!..जालन्यातील प्रकार
राजनांदगाव येथून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकमधून पान पराग पान मसाल्याची अवैध रित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत देवरी येथे राष्ट्रीय महामार्गावर संबंधित ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये पान मसाल्याची २१ हजार पाकीटे आढळून आली. ट्रकचालकाकडे या मालाचे बिलही नव्हते. परिणामी देवरी पोलिसांनी ट्रकसहित माल जप्त केला आहे. बाजारात या मालाची किंमत २५ लाख रुपये आहे. तर १५ लाखांचा ट्रक अशी एकूण ४० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
छुप्या पद्धतीने तंबाखूची वाहतूक
महाराष्ट्र राज्यात सुगंधित तंबाखू, पान मसाला ,गुटख्याच्या विक्रीला प्रतिबंध आहे. तरीही जवळच्या राज्यातून तंबाखू छुप्या पद्धतीने महाराष्ट्र पोहोचविला जात असतो.
हेही वाचा - कोरोनाची लस, व्हेंटिलेटर देण्यात महाराष्ट्राबरोबर केंद्राचा दुजाभाव, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप