गोंदिया - दिवंगत मनोहर भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींचा सुवर्ण पदक देऊन दर वर्षी ९ फेब्रुवारीला सन्मान करण्यात येत असतो. यावर्षी सुद्धा हा सोहळा पार पडला. यंदा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल व अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी मनोहर भाई पटेल यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल अभिवादन करत ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार व्हावा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय प्रफुल पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कानमंत्रावर चालत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मनोहर भाई पटेल व प्रफुल पटेल यांनी शिक्षण संस्था आपल्या नावावर स्थापन केल्या असून आपण देखील आपल्या राज्यात शिक्षण संस्था सुरु केल्या आहेत. मात्र त्या कुणाच्या नावावर नसून समाजाच्या नावावर असल्याचे राज्यपाल यांनी सांगितले.
मनोहर भाई पटेल हे स्वतः अशिक्षित असताना त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकाच दिवशी २२ शाळा उघडल्या. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात शेकडो शाळा-महाविद्यालये उघडली असल्याने. गोंदिया जिल्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता इतर ठिकाणी जावे लागत नाही. यामुळे त्यांच्या स्मृतीनिमित्त दर वर्षी ९ फेबूरवारीला गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. आज ९ फेब्रुवारीला या सत्कार सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले व त्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. गुणवंतांमध्ये १९ पैकी १६ मुली असल्याने आज शिक्षणात मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. मुलांना मुलींकडून शिकण्याची गरज असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.
प्रफुल पटेल हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कान मंत्रावर चालत असून सबका साथ सबका विकास यांच्यावरच गोंदिया-भंडारा जिल्ह्यात सबका साथ सबका विकास साधला असल्याचे कोश्यारी यांनी या वेळी म्हटले. तर प्रफुल पटेलांनी देखील मनोहर भाई पटेल यांच्या विषयी माहिती दिली.