गोंदिया - तिरोडा मार्गावर नागपूरवरून गोंदिया येथे एलईडी टिव्ही आणि रेफ्रिजरेटर घेऊन येणारा ट्रक पलटी झाला. कुडवा गावाजवळ झालेल्या या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चालक हा मद्य प्राशन करून ट्रक चालवत असल्याने नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातानंतर ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला आहे.
छोटू असे या फरार ट्रक चालकाचे नाव आहे. गोंदिया एमआयडीसीजवळ मूडीकोटा येथे एका दुकाचाकीलाही त्याने धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला जखमी झाली. मात्र, ट्रक चालकाने तिथे ट्रक न थांबवता तिथून पळ काढला. पुढे कुडवा येथे आल्यानंतर हा ट्रक पलटी झाला.
हेही वाचा - नागपुरातील 'देवगिरी' जयंत पाटील, की अजित पवारांचे करणार स्वागत?
अपघात होताच स्थानिक नागरिकांनी जखमी ट्रक चालकाला ट्रकमधून बाहेर काढले आणि पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, पोलीस येण्याअगोदरच ट्रक चालक पसार झाला. या अपघाताची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.