गोंदिया : राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत ( Maharashtra Corona Cases Increased ) आहे. तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचा प्रसार वाढला ( Gondia Corona Cases Increased ) आहे. आज जिल्ह्यात 14 रुग्णांची नोंद झाल्याने सक्रीय रुग्णांची संख्या 50 च्या वर गेली आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नयना मुंडे ( Gondia Collector Nayan Munde On Corona ) म्हणाल्या की, "गोंदिया जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेच्या ( Corona Third wave )दिशेने वाटचाल करत आहे. त्याासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. मात्र, तिस-या लाटेची आपत्तीपासून दूर राहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. नागरिकांनी मास्क, सामाजिक अंतर या उपाययोजना राबवत लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले."
रुग्णसंख्येत तिपटीने वाढ
जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्ण नसला तरीही, मागील दोन आठवड्यांपासून डेल्टा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डिसेंबरच्या तुलनेत पॉझिटिव्हीटी रेट तिप्पटीने वाढल्याने जिल्ह्याची वाटचाल तिसऱ्या लाटेच्या दिशेने होत असल्याची चिंताही यावेळी व्यक्त करण्यात आली.
गोंदिया व आमगाव हॉटस्पॉट
नव्या बाधितांसह सक्रीय रुग्णांची संख्या 55 वर पोहचली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील 31, आमगाव तालुक्यातील 18, सालेकसा तालुक्यातील 3, तिरोडा 1 व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. यातील 6 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे सर्व रुग्ण लक्षणे विरहित असल्यामुळे चिंतेची बाब दिसून येत नाही.
15 ते 18 वर्ष वयोगटातील 68 हजार 321 लाभार्थ्यांचे उद्यिष्ट
राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यात 3 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील युवक-युवतींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. यासाठी जिल्ह्यातील 68 हजार 321 जण पात्र आहेत. त्याचसोबत 12 हजार 232 आरोग्य कर्मचारी, 27 हजार 661 फ्रंटलाईन वर्कर यांना 10 जानेवारी पासून बुस्टर डोस दिला जाणार आहे.
जिल्ह्यात 253 व्यक्ती विदेशातून दाखल
डिसेंबर 2021 पर्यंत गोंदिया जिल्ह्यात 253 व्यक्ती विदेशातून दाखल झाले आहेत. यामध्ये कतार 72, युएई 59, युएसए 17, ऑस्ट्रेलिया 2 यासह मालदिव व कुवेत या देशातून आलेल्या प्रवाशांचा समावेश आहे. यामधील 3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
सीसीसी पुन्हा सुरू होणार
पहिल्या व दुसऱ्या लाटेवेळी आरोग्य उपाययोजनेसाठी तालुका स्थरावर 12 सीसीसी केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र, दुसरी लाटेनंतर हे केंद्र बंद केले गेले. दरम्यान, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सज्ज झाला असून, सर्व केंद्र पुन्हा सुरु केले जाणार आहे.
हेही वाचा - Minister Rajesh Tope - राज्यात शंभर टक्के लॉकडाऊनची गरज नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे