ETV Bharat / state

कुख्यात गुंड गणीला मध्य प्रदेशातून अटक; गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - गोंदिया गुन्हे शाखा गुंड गणी अटक

खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, जबरी चोरी, अशा विविध गुन्ह्यात आरोपी असलेला छोटू जब्बार गणी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Criminal
गुन्हेगार
author img

By

Published : Sep 1, 2020, 3:19 PM IST

गोंदिया - मोका अंतर्गत येणाऱ्या विविध गुन्ह्यातील फरार आरोपी जुल्फिकार उर्फ छोटू जब्बार गणी याला अटक करण्यात आले आहे. 2016 तो फरार होता. बालाघाट येथे आपल्या बहिणीच्या घरी गणी आल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून गणीला अटक केले.

कुख्यात गुंड गणीला मध्यप्रदेशातून अटक

९ सप्टेंबर २०१६ ला मरारटोला येथे गणशोत्सवा दरम्यान रेती भरलेला एक भरधाव ट्रॅक्टर मंडपात आला होता. गावकऱ्यांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाला वाहन हळू चालवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आरोपी गणी हा आपल्या साथीदारांसह तेथे आला. त्यांनी लोखंडी रॉड, तलवारी आणि पिस्तुल काढून गावातील नागरिकांना धमकावले. शिवलाल जगनलाल म्हात्रे यांच्या मानेला तलवारही लावली. रेतीच्या वाहनांना रोखल्यास गावकऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली. शिवलाल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलीस ठाण्यात गणी आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

गणी हा खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, जबरी चोरी, अशा विविध गुन्ह्यात आरोपी होता. त्याचप्रमाणे त्यावर बल्काराचा एक गुन्हाही दाखल झालेला होता. गेल्या चार वर्षांपासून आरोपी गणी हा फरार होता. यादरम्यान पोलिसांनी विविध पथकं तयार करून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे त्याचा शोध घेतला. मात्र, तो हाती लागला नाही.

दरम्यान, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेच्या रमेश गर्जे यांच्याकडे दिले. आरोपी गणी मध्यप्रदेश येथे आपल्या बहिणीकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक २९ ऑगस्टपासूनच बालाघाट येथे आले होते. ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता गणी आपली बहिण निलोफर सिराज हिच्याकडे आला. पोलिसांनी लगेच कारवाई करत त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.