गोंदिया - कोरोना विषाणूचा अटकाव होत नसल्याने राज्य सरकारने राज्यभरात निवासी भागात कलम 144 नुसार संचारबंदी लागू केली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग पाहता सर्दी, तापाचा जोर दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात आज (मंगळवारी) फिव्हर ओपीडी सुरु करण्यात आली आहे.
यावेळी पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, नागपूर तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना विषाणूच्या भीतीमुळे आपली आरोगय तपासणी केली. यावेळी 2 जणांना आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे. यांच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
गोंदिया जिल्यात आतापर्यंत 121 नागरिक विदेशातून परतले असून 5 संशयित नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 121 लोकांच्या संपर्कात आतापर्यंत 508 लोक आले असून एकूण 629 नागरिकांना घरीच विलगीकरण कक्षात राहण्यास सांगण्यात आले आहे.