गोंदिया - अज्ञातांनी एका शेतकऱ्यांच्या शेतातील आठ एकर असलेले धानाचे पुंजणे जाळल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील ही सातवी घटना आहे. हा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला असून, शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव तालुक्यातील मेंगाटोला येथील देवराम कापसे यांच्या शेतात हा प्रकार घडला.
हेही वाचा - धुळे जिल्हा परिषद : अध्यक्षपदी तुषार रंधे यांची बिनविरोध निवड
गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख जातो. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याला या आस्मानी संकटाचा सामना करावा लागला. मागील दोन महिन्याांपासून धानाचे पुंजणे जाळण्याचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एका शेतकऱ्याचे पुंजणे जाळले आहे.
जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मेंगाटोला येथील शेतकरी देवराम कापसे यांच्या शेतातील आठ एकरातील जर श्रीराम जातीचे धानाचे पुंजणे ठेवण्यात आले होते. मात्र, मध्य रात्री अज्ञात आरोपींनी त्यांच्या शेतातील धानाचे पुंजन्यांना आग लावून सर्व आगीच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे शेतकरी आथ्रीक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भारपाईची मागणी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.