गोंदिया - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांना घरी बसून याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने डॉक्टर्स ऑन कॉल २४ तास ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून याची सुरुवात करण्यात आली असून दोन मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत.
8308816666 व 8308826666 या क्रमांकावर कॉल केल्यास तुम्हाला घर बसल्या कोरोना संदर्भात माहिती मिळू शकेल.
सर्दी, खोकला, ताप, घशाचे संक्रमण इत्यादीची माहिती नागरिकांना देण्यासाठी 24 तास तीन पाळीमध्ये प्रशिक्षित व तज्ञ डॉक्टरांची चमू फोनवर आपल्याला सेवा देणार आहे. प्रत्येक पाळीत दोन डॉक्टरांचा समावेश असून दररोज सहा डॉक्टर्स व दोन आरक्षित डॉक्टरांची चमू तसेच सदर कामासाठी एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोबतच नागरिकांना योग्य सल्ला घेण्यासाठी 8308816666 आणि 8308826666 या दोन भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कोरोना विषयीची माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला किंवा परिसरातील लोकांना याची लक्षणे दिसत असलतील तर या नंबर वर काल केल्यास माहिती तर मिळेल सोबतच तुम्हाला आरोग्य विषयी सुविधा देखील मिळणार असून डॉ. ऑन काल ही सेवा देणारा गोंदिया जिल्हा हा राज्यात पहिला जिल्हा आहे. जी अशी माहिती देणार आहे.