ETV Bharat / state

क्षुल्लक कारणावरून सुनेकडून सासूची गळा दाबून हत्या, गोंदियातील घटना

author img

By

Published : Oct 25, 2020, 9:56 PM IST

क्षुल्लक कारणावरून सुनेने सासूची गळा आवळून हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातल्या तीगावमध्ये घडली आहे. आरोपी सुनेला अटक करण्यात आली असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

gondia news
सुनेकडून सासूची हत्या

गोंदिया - क्षुल्लक कारणावरून सुनेने सासूची गळा आवळून हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातल्या तीगावमध्ये घडली आहे. आरोपी सुनेला अटक करण्यात आली असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तीगावमध्ये सुनेने क्षुल्लक कारणावरून सासूची हत्या केली. डिलेश्वरी बारेवार असे या आरोपी सुनेचे नाव आहे. तर तिरणबाई बारेवार असे हत्या करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. आरोपीने घरात कोणी नसल्याची संधी साधून आपल्या सासूची गळा आवळून हत्या केली व सासूचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. दरम्यान मृतदेहाला अंघोळ घालताना गळ्यावर हाताचे निशाण आढळल्याने तिरणबाई यांच्या मुलीला संशय आला. त्यांनी याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान शवविच्छेदन अहवालातून या महिलेची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी सुनेकडे चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.