ETV Bharat / state

अनेक महिन्यांपासून घंटागाड्या बंद; संतप्त नगरसेवकांनी फेकला नगराध्यक्षांच्या दालनात कचरा - corporator throws garbage gondia

गोंदिया नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. मात्र, ही नगर परिषद भोंगळ कारभारामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहत आहे. मागील अनेक महिन्यांपासून शहरात कचरा उचण्यासाठी कचरा गाडी आणि घंटागाड्या फिरत नाहीत. यामुळे शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. शहरातील कचरा उचण्याची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे.

gondia nagar parishad, gondia
गोंदिया नगर परिषद
author img

By

Published : Jan 10, 2020, 8:28 AM IST

गोंदिया - येथील नगर परिषद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मागील अनेक महिन्यांपासून शहरात कचरा उचलण्यासाठी कचरा गाडी आणि घंटागाड्याच येत नाहीत. यामुळे संतप्त नगरसेवकांनी आपल्या वॉर्डातील कचरा आणला. एवढेच नव्हे तर नगराध्यक्ष यांच्या दालनातच कचरा टाकला. यावेळी नगरसेवक आणि अध्यक्ष यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. यावेळी बराच गोंधळ उडाला होता.

गोंदिया नगरपरिषदेतील प्रकार

गोंदिया नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. मात्र, ही नगर परिषद भोंगळ कारभारामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहत आहे. मागील अनेक महिन्यांपासून शहरात कचरा उचण्यासाठी कचरा गाडी आणि घंटागाड्या फिरत नाहीत. यामुळे शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. शहरातील कचरा उचण्याची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे. मात्र, नगर परिषदेच्या कारभारामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याबाबत नगर सेवकांनी अध्यक्षांकडे अनेकदा तक्रारी केली. मात्र, यानंतरही त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली. मुख्य म्हणजे नगर परिषदेकडे गाड्यांमध्ये डिझेल भरायला पैसे नसल्यामुळे शहरात कचरा गाडी आणि घंटागाड्या फिरत नाहीत. त्यामुळे शहरात जिकडे-तिकडे कचराच कचरा दिसून येतो. मात्र, याकडे नगरपरिषदेला लक्ष द्यायला तयार नाही.

हेही वाचा - महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना घोषित रक्कम मिळाली नाही, काका पवारांच्या गौप्यस्फोट

तर, दिवाळीपासून परिषदेचे मुख्य अधिकारी नसल्याने शहरातील अनेक कामे खोळंबली आहेत. शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले असल्याने संतप्त नगरसेवकांनी गुरूवारी चक्क शहरातील कचरा गोळा केला. नंतर हा कचरा नगर परिषदेत आणि नगराध्यक्ष यांच्या दालनात फेकण्यात आला.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 09-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_09.jan.20_np_7204243
टीप :- रेड्डी टू एयर पैकेज पाठवली आहे
संतप्त नगरसेवकांनी नगर परिषद अध्यक्ष यांच्या दालनात फेकला शहरातील कचरा
नगरसेवक व अध्यक्ष यांच्यात शाब्धिक बाचाबाची
अनेक महिन्यांपासून घंटागाड्या बंद
Ancor:- गोंदिया नगर परिषद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो आज तर संतप्त नगरसेवकांनी आपल्या वॉर्डातील कचरा आणून गोंदिया नगर परिषदेत कचरा घातलाच घातला यावरही न थांता चक्क नगर अध्यक्ष यांच्या दालनात हि कचरा टाकला. त्यामुळे नगर परिषदेत मोठा गोंधळ उडाला. या वरच हा गोंधळ थांबला नाहि तर नगरसेवक आणि अध्यक्ष यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. कारण मागील अनेक महिन्यापासून शहरात कचरा उचण्यासाठी कचरा गाडी व घंटागाड्याच येत नाही. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ठिगारे जमा होत चालेले असल्यामुळे नगर सेवकांना हे पाऊल उचलावे लागले.
VO :- गोंदिया नगर परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. मात्र ही नगर परिषद भोंगळ कारभारामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतेय. मागील अनेक महिन्या पासून शहरात कचरा उचण्यासाठी कचरा गाडी व घंटागाड्या फीरत नाही त्यामुळे शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात कचर्याचे ठिगारे निर्माण झाले आहेत. शहरातील कचरा उचण्याची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे. मात्र नगर परिषदेच्या दुलशामूळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याबाबद नगर सेवकांनी अध्यक्ष यांचेकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याच्या तक्रारीना केराची टोपली दाखविण्यात आली. मुख्य म्हणजे नगर परिषदेकडे गाड्यांमध्ये डिझेल भरायला पैसे नसल्यामुळे शहरात कचरा गाडी व घंटागाड्या फिरत नाहि. त्यामुळे शहरात जिकडे तिकडे कचराच कचरा दिसून येतो. परंतु याकडे नगर परिषदे ला याकडे लक्ष द्यायला तयार नाहि. तसेच दिवाळी पासून परिषदेचे मुख्य अधीकारी नसल्याने शहरातील अनेक कामे खोळंबली असुन शहरात कचऱ्याचे प्रमाण वाळले असल्याने त्यामूळे संतप्त नगरसेवकांनी आज चक्क नगरसेवकांनी शहरातील कचरा गोळा करून नगर परिषदेत व नगर अध्यक्ष यांच्या दालनात कचरा फेकलाय.
PTC :- ओमप्रकाश सपाटे, ईटीव्ही भारत, गोंदिया
BYTE :- जोश्ना मेश्राम (नगर सेवक)
BYTE :- संकल्प खोब्रागडे (नगर सेवक)
BYTE :- अशोक इंगळे (अध्यक्ष नगर परिषद, गोंदिया)
BYTE :- पंकज यादव (नगर सेवक) हिंदी बाईट बोलणारा
PTC :- ओमप्रकाश सपाटे, ईटीव्ही भारत, गोंदिया Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.