गोंदिया - ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या खामरी या गावात कौटुंबीक कलहातून छोट्या भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी एक तासात अटक केली आहे. गणेश बुधराम मेंढे (रा. खमारी) असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे तर महेश बुधराम मेंढ असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे.
हेही वाचा - खुन प्रकरणातील सहा वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद
गणेशने वहिनीशी वाद घातल्यामुळे महेश या त्याच्या लहान भावाने त्याचा गळा आवळून खून केला. गणेशने आपल्या पत्नीला पाणी देण्याच्या कारणावरुन मारहाण करित होता. दरम्यान, महेशने गणेशला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर ही घटना घडली. यावेळी महेश मात्र घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिसांनी याप्रकरणी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आरोपी महेशला घटनेनंतर एका तासातच अटक केली.
हेही वाचा - नाशिक : भनवड यात्रेत किरकोळ वादातून तरुणाचा खून