ETV Bharat / state

एव्हरग्रीन हॉटेलमध्ये प्रेयसीला नेलं अन् केला असा प्रयत्न की ती पण हादरली - Gondia boyfriend suicide

गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीवर नाराज असलेल्या प्रियकराने विष प्राशन करुन स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न Boyfriend suicide attempt by consuming poison in Gondia केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तरुणाने इतक्या टोकाचा निर्णय घ्यायला नको होता अशी भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या घटनेमुळे त्याची प्रेयसीदेखील भेदरली आहे. एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर प्रियकराने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा dispute with girlfriend boyfriend tried suicide शहरात आहे.

Boyfriend suicide attempt by consuming poison in Gondia
एव्हरग्रीन हॉटेलमध्ये प्रेयसीला नेलं अन्
author img

By

Published : Aug 19, 2022, 10:30 PM IST

Updated : Aug 19, 2022, 10:44 PM IST

गोंदिया गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीवर नाराज असलेल्या प्रियकराने विष प्राशन करुन स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न Boyfriend suicide attempt by consuming poison in Gondia केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तरुणाने इतक्या टोकाचा निर्णय घ्यायला नको होता अशी भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या घटनेमुळे त्याची प्रेयसीदेखील भेदरली आहे. एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर प्रियकराने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा dispute with girlfriend boyfriend tried suicide शहरात आहे. प्रियकरावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एव्हरग्रीन हॉटेलमधील ही तिसरी घटना प्रेयसीवर नाराज झालेल्या एका तरुणाने संतापात टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. या तरुणाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदियातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये संबंधित घटना घडली आहे. विशेष म्हणजे एव्हरग्रीन हॉटेलमध्ये गेल्या आठ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या हॉटेलमध्ये घडत असलेल्या सततच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तातडीने रुग्णालयात नेल्याने वाचले प्राण एव्हरग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रियकराचे शतक जांगडे असं नाव आहे. तो 23 वर्षांचा असून गोंदियातील आंबाटोली फुलचुर येथील रहिवासी आहे. तो आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये थांबला असताना दोघांमध्ये भांडण झालं. या भांडणाच्या रागातून शतकने विष प्राशन करून टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. शतकने टोकाचा निर्णय घेतल्यानंतर हॉटेल प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या प्रियकरावर गोंदियातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

हेही वाचा Shimla Hotel Sex Racket शिमलामधील हॉटेलवर चालायचे सेक्स रॅकेट

Last Updated : Aug 19, 2022, 10:44 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.