ETV Bharat / state

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; अन्यथा, रस्त्यावर उतरू - भाजप महिला मोर्चा - bjp demands dhananjay mundes resignation

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. तसेच, राजकारण सुरू झाले. राजीनामा दिला नाही तर, भाजप आंदोलन करेल, असा इशारादेखील दिला होता. या मागणीसाठी भाजप महिला मोर्चातर्फे अनेक महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे.

गोंदिया भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

author img

By

Published : Jan 19, 2021, 6:40 PM IST

गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. तसेच, राजकारण सुरू झाले. राजीनामा दिला नाही तर, भाजप आंदोलन करेल, असा इशारादेखील दिला होता. त्यावर आज गोंदिया येथील भाजप महिला मोर्चातर्फे अनेक महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला असून धनंजय मुंडे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, याकरिता निवेदन दिले आहे. मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर, भाजप महिला मोर्चाद्वारे रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; अन्यथा, रस्त्यावर उतरू - भाजप महिला मोर्चा

हेही वाचा - 'पाटील'धनंजय मुंडेंसारखा पराक्रमी नसावा; श्रीपाल सबनीस यांचा खोचक टोला

महिलेचा मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप

'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की, तुला गायक बनायचे असेल तर, मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचा लाभ घेऊन त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत,' असे सांगत एका महिलेने मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

भाजपची मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. 'एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांचे पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. ही महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत,' अशी माहिती मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केली.

हेही वाचा - मांत्रिकाचा एकाच कुटुंबातील तीन महिलांसह मुलीवर बलात्कार, नागपुरातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.