LIVE -
* 1.30 - दुपारी १ वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान, कडक उन्हातही सुरु आहे मतदान
* १२.०५ - भंडारा-गोंदिया मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १२.२० टक्के मतदान
* ११.०० - मतदान केंद्र २८१ मधील बंद मशीन बदलून मतदान सुरळीत
* 10.14 - क्रं. २८१ मतदान केंद्रात कंट्रोल युनिटमध्ये बिघाड, मतदान थांबले
* 9.37 - राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी सर्व कुटुंबासह मतदान केले. राष्ट्रवादी उमेदवार विजय होईल असा विश्वास केला व्यक्त
* 9.30 - सकाळी ९ वाजेपर्यंत ९ टक्के मतदान
* 9.05 - बंद पडलेले व्हीव्हीपॅट मशीन सुरु करण्यात आले
* 8.55 - भाजप उमेदवार सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी केले मतदान.
* 8.53 - दोन्ही नेत्यांनी दीड लाख मतांनी जिंकण्याचा विश्वास केला व्यक्त.
* 8.47- सुनील मेंढे यांनी मतदानापूर्वी पत्नीसह बहिरेंगेश्वर मंदिर येथे जाऊन पूजा केली आणि त्यानंतर पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला
* 8.40 राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे म्हणाले, लोक भाजपच्या कामाला त्रासले असल्याने आमचा विजयी निश्चित आहे.
* ८.१५ - भंडारा शहरालगत असलेल्या कारदा मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले
* 8.00 - बुथ क्रमांक २७६ मधील व्हीव्हीपॅट मशीन बदलून मतदान सुरु
* 7.20 - बुथ क्रमांक २७६ मधील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड
* भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु आहे. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. मतदारसंघाचा विचार केला असता या ठिकाणी १८ लाख ८ हजार ९४८ मतदार आज आपला मतदानाचा हक्क बाजवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी आज गोंदियाच्या एन एम डी कॉलेज केंद्रावर मतदानाचा हक्क बजावाला.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमदेवार नाना पंचबुद्धे यांनी सह कुटुंब भंडारा शहरातील नूतन शाळेच्या केंदावर मतदान केले तर भाजप उमदेवार सुनील मेंढे यांनी देखील भांडार शहरातील नूतन शाळेतील केंद्रावर मतदान करत आपणच निवडून येऊ, असा दावा केला. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात प्रफुल्ल पटेल जरी या निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांनी नाना पंचबुद्धे यांना लोक निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला. अन्य मतदारदेखील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावत आहेत.