गोंदिया - भारतीय रेल्वेच्या केटरिंग अँड टुरिझम कोऑपरेशन लिमिटेडच्या वतीने भारत दर्शन पर्यटन रेल्वे गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. अयोध्या आणि वैष्णोदेवी या दोन यात्रा या रेल्वेच्या माध्यमातून घडवल्या जाणार आहे. यासाठी आरक्षण सुरू झाले आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोऑपरेशन लिमिटेडच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षेत्रीय प्रबंधक जेराल्ड सोरेंग यांनी याबाबत माहिती दिली.
आठ दिवसांची यात्रा..
31 मार्च 2021 रोजी नागपूर येथील इतवारी रेल्वे स्थानकावरून ही पर्यटन रेल्वे गाडी सोडली जाणार आहे. या गाडीच्या माध्यमातून काशी विश्वनाथ, प्रयागराज, अयोध्या, वैष्णोदेवी अशा धार्मिक स्थळाचे दर्शन घडवले जाणार आहे. 800 प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वे गाडीत वातानुकूलित कोचही असल्याचे सांगण्यात आले. आठ दिवसांच्या या प्रवासात प्रवाशांना केवळ प्रतिदिवस 900 रूपये एवढा खर्च येणार आहे. प्रतिव्यक्ति 9,030 रुपये शयनयानासाठी, तर वातानुकूलित आरक्षणासाठी 1,920 रुपये खर्च येणार आहे. यात प्रवाशांना निवासाची व्यवस्था व तीन वेळा शाकाहारी जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. तसेच वाहनांद्वारे दर्शनस्थळापर्यंत जाण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. या दर्शन स्थळाची माहिती मिळावी यासाठी गार्डची ही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना विमा व इतर गोष्टी दिल्या जाणार आहेत. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझरचे किटही दिले जाणार आहे.
आरक्षणाला सुरुवात..
ही गाडी इतवारी, भंडारारोड, गोंदिया, राजनांदगांव, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, कटनी या स्थानकांवरून प्रवाशांना घेऊन यात्रेसाठी निघणार आहे. या प्रवास रेल्वे गाडीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वैद्यकिय सुविधांची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे माहिती प्रबंधक यांनी सांगितले आहे. 31 मार्चला या प्रवासाला सुरूवात होणार असुन 8 एप्रिलला हे प्रवास पूर्ण होणार आहेत. आरक्षणासाठी www.irctctourism.com या साईटवरुन आरक्षण करता येणार तसेच हॅलाइन क्रमांक 7670908323 या क्रमांकावर संपर्क साधून शकता, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - शेतकऱ्यांना भेटू न देणे ही केंद्राची भूमिका दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे