ETV Bharat / state

गोंदिया तिरोडा मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; 2 जणांचा मृत्यू - two wheeler accident Gondia

अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गोंदिया-तिरोडा मार्गावर भागवत टोला गावाजवळ घडली.

two wheeler accident Gondia Tiroda road
गोंदिया तिरोडा मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
author img

By

Published : Nov 30, 2020, 8:32 PM IST

गोंदिया - अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गोंदिया-तिरोडा मार्गावर भागवत टोला गावाजवळ घडली. रविंद्र ईडपाते (वय २३) आणि रणवीर मरस्कोल्हे ( वय २३, दोघेही रा. खैरवाडी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

दोन्ही तरुण दुचाकीने (क्र. एम.एच ३१ बी.डब्ल्यू २७८) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोंदिया शहराच्या दिशेने येत होते. दरम्यान, मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एक तरुण रस्त्यावर पडला, तर दुसरा तरुण रसत्याच्या कडेला पडला. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत दोन्ही तरुणांचे मृतदेह गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे. अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.

हेही वाचा - 20 एकरातील आधुनिक शेतीचा प्रयोग पोहोचला 700 एकरावर, गोंदियातील शेतकऱ्याची यशोगाथा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.