देवरी (गोंदिया) - तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कोटजांभुरा जंगल परिसरात काल सायंकाळी (२७ सप्टेंबर) अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला. युवकाचा गळा आवळून व धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेची नोंद चिचगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चिचगड पोलिसांनी घटनास्थळ गाठून युवकाच्या मृतदेहाचा तपास केला. त्यात युवकाच्या गळ्यावर दोरीच्या खुणा दिसल्या. तसेच, अंगावर धारदार शस्त्राचे घाव दिसले. त्यामुळे, युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची नोंद चिचगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मृत युवकाची ओळख पटवण्याचे कार्य सुरू आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी