गोंदिया - राज्य सरकार ओबीसीला न्याय मिळवून देत नसल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी छगन भुजबळांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. कुणा कुणाचा राजीनामा मागणार. माझा राजीनामा घ्या, मध्ये प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान , कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा राजीनामा घ्या असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. तुमच्याच सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. तुम्हीच राजीनामा द्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. गोंदियात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य निवडणूक आयोगाने आज काढलेल्या परिपत्रानुसार गोंदिया-भंडारा जिल्ह्यात (Gondia Bhandara Election) २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची मतमोजणी १९ जानेवारी २०२२ ला होणार आहे. ओबीसी प्रवर्गव्यतिरिक्त इतर जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर इतर ओबीसी जागांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तिढा सोडवत १८ जानेवारी २०२२ ला मतदान होणार होईल. तर १९ जानेवारीला २०२२ ला दोन्ही निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये म्हणून काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस नेत्यांनी खुल्या प्रवर्गातील जागेवर ओबीसी समाजाच्या व्यक्तीला उमदेवारी देणार असल्याचे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तर छगन भूजबळ यांनी भाजपाला सुद्धा सल्ला देत म्हणाले तुम्ही देखील खुल्या प्रवर्गातील जागेवर ओबीसी उमदेवारालाच उमेदवारी द्या अशी मागणी भुजबळ यांनी भाजपला केली आहे.
हेही वाचा - Chhagan Bhujabal Allegation on BJP : 'ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवण्यात भाजपाची महत्त्वपूर्ण भूमिका'