ETV Bharat / state

मोठ्या विश्रांतीनंतर गोंदियात पावसाची पुन्हा हजेरी; अतिवृष्टीचाही इशारा - अतिवृष्टीचा ही इशारा

मंगळवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  शेतकरी वर्ग ही या पावसामुळे सुखावला आहे. तसेच हवामान खात्याने जिल्ह्यात दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असून अतिवृष्टीचाही इशारा दिला आहे.

मोठ्या विश्रांतीनंतर गोंदियात पावसाची पुन्हा हजेरी
author img

By

Published : Aug 13, 2019, 10:16 PM IST

Updated : Aug 13, 2019, 11:22 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडत होते. त्यामुळे वातावरणातही बदल झाला होता. नागरिकांना या वातावरणामुळे उन्हाळ्याच्या दिवसा सारखे वाटत होते. नागरिकांना पाऊस कधी पडणार याची प्रतीक्षा लागून राहिली होती. मात्र, मंगळवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्गही या पावसामुळे सुखावला आहे. तसेच हवामान खात्याने जिल्ह्यात दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मोठ्या विश्रांतीनंतर गोंदियात पावसाची पुन्हा हजेरी

जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला जलाशयाचे २ गेट १ फुटाने उघडण्यात आले आहेत. या पुजारीटोला जलाशयाचे गेट उघडल्याने सालेकसा आणि आमगाव तालुक्यातून वाहणाऱ्या वाघ नदीत सोडलेले पाणी दहा तासात पोहोचणार आहे. पहाटे ४ वाजेपर्यंत हे पाणी पोहचणार असून नदी काठाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. गोंदिया जिल्ह्यात पुढच्या २४ तासात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जिल्ह्यातील वाघ नदी आणि वैनगंगा नदी काठावर नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच दुसऱ्याही नदी नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती विभागाने केले आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 13-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_13.aug.19_teachedolan_72042r an43
गोंदियात पावसाची पुन्हा हजेरी उकळ्या पासुन दिलासा
वातावरण झालं थंडगार जिल्ह्यात अतिदुर्ष्टी चे हि संकेत
Anchor :- गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसा पावसाने दांडी मारली असुन पावूस बंद झाला असुन दिवसाला कधी-कधी ऊन निघत असल्याने वातावरणात हि बदल झाला असुन नागरिकांना गर्मीचे दिवसा सारखे वाटू लागले असुन पावूस कधी पडणार याची हि प्रतीक्षा होती मात्र आज पुन्हा दुपार पासुन पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात थंडगार निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असुन शेतकरी वर्ग हि सुखावला आहे. तसेच हवामान खात्याने जिल्ह्यात दोन दिवस पावूस पडण्याचा अंदाज दर्शविला असुन जिल्ह्यात अति दुर्ष्टी चा हि इशारा दिला आहे.
तसेच जिल्हा आपत्ती विभागा द्वारे सांगण्यात आले आहे की जिल्ह्यातील सालेकसा तालुक्या तील पुजारीटोला जलाशयाचे २ गेट ०. ३० मीटर याने १ फूट ने उघडण्यात आले असुन या पुजारी टोला या जलाशयाचे गेट उघडल्याने सालेकसा व आमगाव तालुक्यातून वाहणाऱ्या बाघ नदीत सोडलेला पाणी हा १० तासात पोहचणार असुन याने सकाळी ४ वाजे हा पाणी पोहचणार असुन नदी काठ जवळ जाण्यास टाळावे असे हि आव्हान केले असुन गोंदिया जिल्ह्यात पुढच्या २४ तासात जोरदार पावूस पडण्याचा आशंका असल्याने जिल्ह्यातील बॅग नदी व वैनगंगा नदी काठा वर नागरिकांनी जाण्यास टाळावे तसेच दुसऱ्या नदी नाल्या च्या हि काठावर जाणे टाळावे असे आव्हान जिल्हा आपत्ती विभागाने केले आहे. Body:VO :- Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 11:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.